
Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग
Raigad News: कर्जत-खालापूरात राजकीय उलथापालथ! परिवर्तन आघाडीने मारली बाजी, अजित पवार–ठाकरे गट एकत्र
मागील महाड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने एकला चलो ची भूमिका घेतली होती, तर भाजप-राष्ट्रवादी युती झाली होती. युतीचे नगरसेवक संख्येने अधिक असतानाही नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राहिले होते. हे राजकीय समीकरण आगामी निवडणुकांत कायम राहणार की बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने संघटन बांधणीवर भर दिला असून काही ठिकाणी स्वबळावर उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रमुख नेते कायदेशीर अडचणीत अडकल्याने बैठका, रणनीती आखणी व उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सध्या अनिश्चित अवस्थेत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
शिवसेना (शिंदे गट) कडून मंत्री भरत गोगावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, अदिती तटकरे व अनिकेत तटकरे स्नेहल जगताप यांच्यावर उमेदवार निश्चितीची जबाबदारी आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने कमी वेळेत निर्णय घेणे सर्वच पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. आगामी निवडणुकीत विकास गोगावले (शिवसेना) व सुशांत जाबरे (राष्ट्रवादी) हे प्रमुख दावेदार मानले जात होते, तर हनुमंत जगताप यांच्याकडे निवडणूक व्युहरचनेतील एक अनुभवी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. मात्र, हे सर्व नेते सध्या गुन्ह्यात संशयित असल्याने त्यांच्या सक्रिय सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कार्यकत्यामध्ये निवडणुकीबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
करंजाडी मतदारसंघातून शिवसेना (उद्धव गट) चे उपजिल्हा समन्वयक सरपंच सोमनाथ ओझर्डे इच्छुक असून त्यांनी गोगावले कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या निवडणुकीत शेकाप आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे पक्षही सक्रिय झाले आहेत. हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू आहे, महाड, पोलादपूर व माणगाव तालुक्यांत राजकीय वातावरण तापले असले तरी नेते प्रत्यक्ष मैदानात नसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळलेला आहे. मागील हाणामारीच्या पार्श्वभूमीवर १५ तालुक्यांत शांततेत निवडणूक पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.