Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DCM Sunetra Pawar Live : सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा

Sunetra Pawar Live : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेमध्ये महिलांसाठी खास योजना जाहीर केली आहे. 'लवकर या लवकर जा' ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 02:33 PM
DCM Sunetra pawar vidhan parishad live lavkar ya lavkar ja yojana

DCM Sunetra pawar vidhan parishad live lavkar ya lavkar ja yojana

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांचे विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभाग
  • महिलांसाठी योजना आणि सुरक्षेच्या उपाययोजना केल्या स्पष्ट
  • महिलांसाठी खास ‘लवकर या लवकर जा’ योजना जाहीर
Sunetra Pawar : मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच सभागृहामध्ये सहभागी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेमध्ये महिलांसाठी खास योजना जाहीर केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून महिलांसाठी खास ‘लवकर या लवकर जा’ योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे वर्किंग वुमन असलेल्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

काय आहे ‘लवकर या लवकर जा’ योजना? 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. त्या म्हणाल्या की, “महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.15 ते 9.45 दरम्यान कार्यालयामध्ये लवकर येऊन जेवढा वेळ आधी कामकाज करतील तेवढा वेळ संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजे 30 मिनिटांची सवलत देण्यात आली आहे, अशी घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली आहे. लवकर या लवकर जा योजनेचे फायदे देखील सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की, “या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी होणारी महिलांची गैरसोय ही कमी होण्यासाठी मदत होणार आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले आहे.

हे देखील वाचा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…

त्याचबरोबर महाराष्ट्रातून अनेक महिला या गायब होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महिलांच्या मिसिंग केसबाबत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “हरवलेले मुलं आणि मुली यांचा शोध घेण्याकरिता एकूण 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आली आहेत. त्या अंतर्गत एकूण 42 हजार 594 बालके शोधण्यात आली आहेत. तसेच हरवलेल्या महिलांकरिता राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत आहे. या अंतर्गत शोध ही विशेष मोहिम राबवण्यात येते. यामध्ये 5हजार 66 महिला आणि 2 हजार 771 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यापुढे देखील या मोहिमा प्रभावीपणे चालतील याची श्वाश्वती देते,” अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

पुढे सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या इतर मोहिमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “CSMT, चर्टगेट, बोरिवली या स्टेशनवर रेल्वे पोलिसांमार्फत सायबर क्राईम रोखण्यासाठी यंत्रणा सुरु आहे. तसेच महिलांच्या प्रश्नासाठी राज्य सरकारने भरोसा सेल कार्यरत केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांवर देखील सीसीटीव्ही प्रणाली कार्यरत असून याचे फुटेज पोलिसांना दिले जात आहे. ” शासनाने लाडकी बहीण, नमो भारत सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. तसेच मेट्रोमोनियल साईटवरील फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे.

 

Web Title: Dcm sunetra pawar vidhan parishad live lavkar ya lavkar ja yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
3

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
4

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.