Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories Today: युक्रेनियन लष्कराने दावा केला आहे की त्यांनी दक्षिण भागात ४०० चौरस किलोमीटरचा परिसर पुन्हा ताब्यात घेतला असून रशियन सैन्याला मागे रेटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2026 | 09:55 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 Mar 2026 09:55 AM (IST)

    11 Mar 2026 09:55 AM (IST)

    गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले

    चित्रपटाला शोभावा असा गुन्हेगारी कट उघडकीस आला आहे. एका अदृश्य चेहऱ्याने रचलेल्या ‘हनी-मनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकून एका तरुणाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. ‘सानवी खुराना’ नावाच्या एका प्रोफाईलने आधी प्रेमाचे नाटक केले आणि नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • 11 Mar 2026 09:45 AM (IST)

    11 Mar 2026 09:45 AM (IST)

    गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस!

    मध्यपूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. भारतात 14.2 किलो वाले वजनाचा घरगुती LPG गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून बुकिंग कालावधी देखील 25 दिवस करण्यात आला आहे. भारतात गॅसवर अवलंबून राहिल्यामुळे, एक सामान्य कुटुंब दरवर्षी केवळ गॅसवर किमान 11,000 ते 12,000 रुपये खर्च करते. मात्र या तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही काही किचन अप्लायन्सेस वापरून गॅसवरील तुमचे अवलंबित्व कमी करू शकता. हे किचन अप्लायन्सेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदाच खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही विजेचा वापर करून किचन अप्लायन्सेस वापरू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की किचन अप्लायन्सेस गॅसचा वापर करावा लागणार नसला तरी विजेचा खर्च करावा लागणार आहे. हे इलेक्ट्रिक ऑप्शन्स कोणते आहे जाणून घेऊया.

  • 11 Mar 2026 09:40 AM (IST)

    11 Mar 2026 09:40 AM (IST)

    नागपूर-नांदेड विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू

    नागपूर: विदर्भाची उपराजधानी नागपूर आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर नांदेड यांच्यातील अंतर आता अधिक सुकर होणार आहे. येत्या ३१ मार्च २०२६ पासून या दोन्ही शहरांदरम्यान 'स्टार एअर' या खासगी कंपनीची नियमित विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेमुळे ७ तासांचा रस्ते प्रवास आता केवळ ५० मिनिटांत पूर्ण होणार आहे. शुक्रवार वगळता ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. या वेळापत्रकानुसार, नांदेडहून सकाळी ११:२० वाजता निघणारे विमान १२:१० वाजता नागपुरात पोहोचेल, तर नागपूरहून दुपारी १२:४० वाजता निघणारे विमान १:३० वाजता नांदेडला पोहोचेल. या निर्णयामुळे व्यापारी आणि प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

  • 11 Mar 2026 09:35 AM (IST)

    11 Mar 2026 09:35 AM (IST)

    महाराष्ट्रात  १५ ते १८ दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक

    मुंबई: आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे महाराष्ट्रातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील पेट्रोलियम उत्पादनांचा अधिकृत साठा प्रसिद्ध केला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, राज्यात सध्या सुमारे १५ ते १८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

    विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या २,००,३४८ किलोलीटर पेट्रोलचा साठा असून दररोज १,४०,००० किलोलीटरची विक्री होते. डिझेलचा ४,६५,९२५ किलोलीटर साठा उपलब्ध असून रोज २५,६७७ किलोलीटर खप होतो. तसेच, गॅसचा (LPG) ४,८५,३३२ दशलक्ष टन साठा असून प्रतिदिन सरासरी ९,६२८ दशलक्ष टन विक्री होत आहे. युद्ध लांबल्यास भविष्यात गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

  • 11 Mar 2026 09:30 AM (IST)

    11 Mar 2026 09:30 AM (IST)

    नाशिकमध्ये 'हनी ट्रॅप' आणि क्रिप्टोच्या जाळ्यात तरुणाला ५३ लाखांचा गंडा

    नाशिक: पंचवटी परिसरातून एक खळबळजनक सायबर फसवणुकीची घटना समोर आली असून, एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल ५३ लाख रुपयांना लुटले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे मैत्री करून तरुणीने तरुणाचा विश्वास संपादन केला आणि त्याला 'क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग'मध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. तरुणाने विविध बँक खात्यांवर आणि UPI आयडीवर ही मोठी रक्कम पाठवली. फसवणुकीसाठी एका बनावट प्लॅटफॉर्मचा वापर करून गुंतवणूक कोट्यवधी रुपयांत वाढल्याचे भासवण्यात आले होते. पैसे उकळल्यानंतर तरुणीने तरुणाला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

  • 11 Mar 2026 09:25 AM (IST)

    11 Mar 2026 09:25 AM (IST)

    देशात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा नाही 

    नवी दिल्ली: बाजारपेठेत १०, २० आणि ५० रुपयांच्या चलनी नोटांचा तुटवडा असल्याच्या चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. कमी मूल्याच्या नोटांची कोणतीही कमतरता नसून पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारने मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) नोटांचे वितरण नियमित सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात २६ फेब्रुवारीपर्यंत १० रुपयांच्या ४३९.४० कोटी, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हा पुरवठा समाधानकारक असून नागरिकांनी सुट्या पैशांच्या टंचाईबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 11 Mar 2026 09:20 AM (IST)

    11 Mar 2026 09:20 AM (IST)

    पालघरमध्ये कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर अचानक खडकावर उतरले 

    पालघर: पालघरमधील दातीवारे समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या थरारक लँडिंगमुळे मोठी खळबळ उडाली. मुंबई आणि दमण तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर नियमित गस्तीवर असताना, समुद्रातील एका खडकावर दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली वैमानिकाच्या निदर्शनास आल्या. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने तपासणी करण्यासाठी 'चेतक' हेलिकॉप्टर थेट त्या खडकावर उतरवण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ दहशतवादी घुसखोरीची अफवा पसरली होती आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली. मात्र, तटरक्षक दलाने खबरदारीचा उपाय म्हणून ही चौकशी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 11 Mar 2026 09:15 AM (IST)

    11 Mar 2026 09:15 AM (IST)

    मुंबईत 'एमडीएस' विद्यार्थिनीची आत्महत्या 

    मुंबई: मायानगरी मुंबईतील हाय-प्रोफाइल परिसरात स्तुती सोनवणे (२४) या मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) च्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपासणीदरम्यान स्तुतीच्या खोलीतून ६ पानांची सुसाईड नोट हस्तगत केली आहे. या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली असून, 'टॉक्सिक बॉयफ्रेंड'च्या सततच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून पोलीस या सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

  • 11 Mar 2026 09:10 AM (IST)

    11 Mar 2026 09:10 AM (IST)

    नाशिकमध्ये स्त्री-बीज तस्करीचा पर्दाफाश 

    नाशिक: नाशिकमध्ये स्त्री-बीज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, 'मालती आयव्हीएफ सेंटर'चा संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने भुजबळ फार्म परिसरातील या केंद्रावर धाड टाकून ते तातडीने सील केले आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, गेल्या वर्षभरात या केंद्रातून तब्बल ९६ महिलांचे स्त्री-बीज काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे केंद्राची नोंदणी रद्द करण्यात आली असून, आता नाशिक व ठाणे महापालिका आणि बदलापूर पोलीस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.

  • 11 Mar 2026 09:05 AM (IST)

    11 Mar 2026 09:05 AM (IST)

    पुण्यातील स्मशानभूमींना  १८ गॅस दाहिन्या बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश

    पुणे: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईचा मोठा परिणाम आता पुणे शहराच्या नागरी सेवांवरही दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या व्यावसायिक गॅस धोरणातील बदलांमुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील 'एलपीजी' (LPG) वर चालणाऱ्या १८ गॅस दाहिन्या तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीतील तीन महत्त्वाच्या दाहिन्यांचा समावेश आहे.

    पुणे शहरात सध्या एकूण ५२ दाहिन्या असून, त्यापैकी १८ गॅसवर तर उर्वरित विद्युत आणि 'एपीसी' प्रणालीवर आधारित आहेत. गॅस दाहिन्या बंद झाल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • 11 Mar 2026 09:00 AM (IST)

    11 Mar 2026 09:00 AM (IST)

    पुण्यात दहावीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले 

    पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात दहावीच्या बोर्ड परीक्षेचे दोन पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि गणित भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच एका 'टेलिग्राम' ग्रुपवर प्रसारित झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधित ग्रुपचे प्रशासक (ॲडमिन) आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस आता या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत.

  • 11 Mar 2026 08:55 AM (IST)

    11 Mar 2026 08:55 AM (IST)

     पिंपरी-चिंचवडमधील  गॅस टंचाईमुळे केटरर्सकडून ऑर्डर्स रद्द

    पिंपरी-चिंचवड: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत आणि नियोजित लग्नसोहळ्यांपर्यंत पोहोचले आहेत. युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी (LPG) गॅस टंचाईचा मोठा फटका शहरातील केटरिंग व्यवसायाला बसला असून, पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या सुमारे १० हजार लग्नसोहळ्यांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. गॅस पुरवठा ठप्प झाल्याने शहरातील साडेचारशे केटरर्सनी जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तसे निरोप वधू-वर पित्यांना दिले जात आहेत. यामुळे ऐन आनंदाच्या क्षणी शेकडो कुटुंबांवर लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलण्याची वेळ आली असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

  • 11 Mar 2026 08:50 AM (IST)

    11 Mar 2026 08:50 AM (IST)

    परळमध्ये शोरमा स्टॉलवरून वाद; मराठी महिला व्यावसायिकाची 'शिवतीर्था'वर धाव

    मुंबई: परळ येथील लोढा प्रीमो इमारतीजवळ शोरमा स्टॉल लावण्यावरून स्थानिक रहिवासी आणि मराठी व्यावसायिक अक्षिका मसूरकर यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे. इमारतीमधील २० ते २२ अमराठी रहिवाशांनी एकत्र येऊन आपल्याला दमदाटी केली आणि स्टॉल हटवण्यास भाग पाडले, असा आरोप मसूरकर यांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली असून, मनसे नेते अमित ठाकरे आज दुपारी ३ वाजता 'शिवतीर्थ' निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणामुळे परळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra to World Breaking News:

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात ‘एस्मा’ (ESMA) लागू

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतून होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा’ अर्थात ‘एस्मा’ (ESMA) लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. होर्मुझ जलमार्गातून होणारा पुरवठा ठप्प झाल्याने एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या कायद्यामुळे रुग्णालये आणि घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत राहणार असून, साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असेल. तसेच तेल कंपन्यांना इतर उत्पादने कमी करून केवळ एलपीजी उत्पादनावर भर देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title: Maharashtra breaking news 11th march live updates maharashtra national international politics crime cricket sports entertainment war world war3 us israel iran war latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

DCM Sunetra Pawar Live : सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा
1

DCM Sunetra Pawar Live : सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…
2

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Purandar News: पुरंदरमध्ये सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे तर…; राजकीय गणिते काय?
4

Purandar News: पुरंदरमध्ये सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे तर…; राजकीय गणिते काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.