• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Raigad Contractors Stage Protest In Front Of District Collectors Office Due To Ladki Bahin Scheme

Raigad News: ठेकेदारांच्या गळ्याशी आली “लाडकी बहीण योजना”; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शासनाने याचा गांभीर्याने विचार करून ठेकेदारांची थकीत बीले अदा करण्‍यासाठी तातडीने तरतूद करावी. याबाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आज आंदोलन करण्‍यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2025 | 04:20 PM
ठेकेदारांच्या गळ्याशी आली "लाडकी बहीण योजना"; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ठेकेदारांच्या गळ्याशी आली "लाडकी बहीण योजना"; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलिबाग/ भारत रांजणकर विविध शासकीय विभागातील केलेल्‍या कामांची कोटयवधी रूपयांची बिले थकल्‍याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत. आज रायगड जिल्‍हयातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी थकीत बीलांची रक्‍कम तातडीने अदा करावी अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडण्‍याचा इशारा यावेळी देण्‍यात आला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य कंत्राटदार महासंघाच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन करण्‍यात आले. राज्‍यभरातील शासकीय कामांची बीले थकल्‍याने ठेकेदार मेटाकुटीला आले आहे. नाईलाजास्‍तव त्‍यांनी सरकारी कामे 5 फेब्रुवारीपासून थांबवली आहेत. वारंवार मागणी करूनदेखील शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मागील दोन वर्षांपासून शासनाने जी कामे काढली ती अर्थसंकल्‍पाच्‍या तरतूदीपेक्षा अधिक आहेत. ज्‍या कामांना तरतूद नसताना कार्यारंभ आदेश देण्‍यात आले, यातील बरीचशी कामे 70 ते 80 टक्‍के पूर्ण झाली आहेत. तर काही 100 टक्‍के झाली आहेत. मात्र निधी अभावी सगळंच अडलं असल्याने  अनेकांनी कामासाठी माल तसेच मशिनरी विकत घेण्‍यासाठी कर्ज काढले आहे. मात्र बीलाची रक्‍कम न मिळाल्‍याने कर्जाचे हप्‍ते थकले आहेत. कामगार, कर्मचारयांचे पगार देणे अशक्‍य होवून बसले आहे. शासनाच्‍या उदासीन धोरणामुळे आमच्‍यावर ही वेळ आल्‍याचे ठेकेदारांचे म्‍हणणे आहे.

शासनाने अनेक लाभाच्‍या योजना जनतेसाठी सुरू केल्‍या. त्‍यावर खर्च केला जात आहे. त्‍यामुळे विकासकामांसाठी जे बजेट होते ते वळवण्‍यात आले. परीणामी विकास कामांचे पैसे थकले आहेत. त्‍यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. मागील मार्च महिन्‍यात एकही पैसा मिळाला नाही. यंदादेखील काही तरतूद असल्‍याचे अद्याप दिसत नाही. शासनाला आम्‍ही 14 जानेवारी रोजी यासंदर्भात पत्र दिले परंतु त्‍याचे काहीही उत्‍तर शासनाने दिले नाही. त्‍यामुळे आमची थकीत बीले तातडीने मिळावी यासाठी हे आंदोलन केल्‍याचे ठेकेदारांनी सांगितले.

जिल्‍हयात 1500 कोटी रूपयांची विकासकामे झाली परंतु दोन वर्षांपासून पैसे मिळाले नाही. अलीकडे जो काही निधी उपलब्‍ध झाला तो अतिशय तुटपुंजा होता. त्‍यातून आमचे व्‍याजही आम्‍ही देवू शकलो नाही. यावेळच्‍या अर्थसंकल्‍पात आमच्‍या बीलांसाठी भरीव तरतूद झाली नाही तर रायगड जिल्‍हयात चक्‍काजाम करण्‍याचा इशारा यावेळी देण्‍यात आला. आंदोलकांच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेवून निवेदन दिले. बीले थकल्‍यामुळे येणाऱ्या समस्या सांगण्यात आल्या आहेत. कोकण विभागीय अध्‍यक्ष प्रकाश पालरेचा यांच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन छेडण्‍यात आले. यावेळी जिल्‍हयातील शासकीय ठेकेदार मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

सरकारने विकास कामांसाठी ठेवलेला राखीव निधी वैयक्तिक लाभाच्‍या योजनांकडे वळवला. त्‍यामुळे शासकीय ठेकेदारांची बीले रखडली आहेत. परीणामी राज्‍यभरातील ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून ठेकेदारांची थकीत बीले अदा करण्‍यासाठी तातडीने तरतूद करावी. याबाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आज आंदोलन करण्‍यात आले, असं ठेकेदारांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Raigad contractors stage protest in front of district collectors office due to ladki bahin scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Alibaug
  • Ladki Bahin Yojana
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
1

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
2

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
3

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र
4

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Nov 19, 2025 | 09:35 AM
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

Nov 19, 2025 | 09:12 AM
लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Nov 19, 2025 | 09:12 AM
US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Nov 19, 2025 | 09:10 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

Nov 19, 2025 | 09:09 AM
‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

Nov 19, 2025 | 08:55 AM
Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Nov 19, 2025 | 08:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.