Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू

रायगड किल्ल्यावरील सुरक्षेबाबत शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेले 54 CCTV कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 02:05 PM
Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू

Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू

Follow Us
Follow Us:
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे 54 सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत.
  • राजसदर, होळीचा माळ, तिकीटघर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरू झालेल्या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे.
  • समाधी परिसरासह चार कॅमेरे अद्याप बंद असून त्यांचे हस्तांतरण आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महाड: रायगड किल्लायेथील सुरक्षेच्या दृष्टीने एक दिलासादायक घडामोड घडली. अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित झाले आहेत. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आल्याने शिवभक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Raigad News: हॉस्पिटलमध्ये शूटिंगमुळे रुग्ण हैराण? रेवदंडा आरोग्य केंद्राबाबत नागरिकांचा संताप, OPD सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार

गेल्या काही महिन्यांपासून रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. गडावरील काही वादग्रस्त घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. छत्रपतींच्या राजधानीतच सुरक्षा यंत्रणा बंद असल्याची बाब अनेक शिवभक्तांच्या मनाला खटकत होती. एप्रिल २०२६ मध्ये या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर समाजमाध्यमांमधून विविध स्तरावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी बंद पडलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक कामे पूर्ण करून गडावरील ५४ कॅमेरे ६ जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून पुन्हा सुरू केले आहेत.

रायगडावरील अनुचित प्रकारांवर नियंत्रण शक्य

राजसदर, होळीचा माळ, तिकीटघर तसेच गडावरील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

चार कॅमेरे बंद अवस्थेत

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि अन्य दोन ठिकाणी पुरातत्त्व विभागामार्फत बसविण्यात आलेले चार कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे कॅमेरे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेही पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra monsoon: अरबी समुद्रात पाऊस रेंगाळल्याने राज्यात उष्णतेचा कहर;राज्यासाठी धोक्याची घंटा

किल्ले रायगडावरील सुरक्षेबाबतची चिंता दूर

२६ व २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होणार आहे. अशा वेळी सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू झाल्याने गडावरील सुरक्षा अधिक सक्षम झाली असून, छत्रपतीच्या राजधानीच्या संरक्षणासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना शिवभक्तांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांनंतर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्याने गडाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता दूर झाली असून शिवभक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad fort security boosted as 54 cctv cameras become operational ahead of shivrajyabhishek ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Fort Raigad
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.