Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : उद्यापासून माथेरान बंद ; माथेरान पर्यटन बचाव समिती मोठा निर्णय

उद्यापासून माथेरान बंद सुरू होणार असून या काळात माथेरान मधील सर्व व्यवसाय बंद असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2025 | 06:18 PM
Raigad : उद्यापासून माथेरान बंद ; माथेरान पर्यटन बचाव समिती मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

रायगड / संतोष पेरणे :  माथेरान शहरात येणाऱ्या पर्यटकांची होणारी फसवणूक पर्यटकांची आर्थिक लुटणार थांबावी म्हणून प्रशासनाने कडक पाऊल उचलावीत यासाठी माथेरान पर्यटन बचाव समिती प्रशासनाकडून कार्यवाहीची अपेक्षा करीत होती.मात्र त्याबाबत माथेरान पर्यटन बचाव समितीला प्रशासन सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले असल्याने शेवटी माथेरान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान,उद्यापासून माथेरान बंद सुरू होणार असून या काळात माथेरान मधील सर्व व्यवसाय बंद असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

बैठकीत प्रशासनाकडून माथेरानचे महसूल अधीक्षक अभयसिंह ठाकूर, पोलिस अधिकारी अनिल सोनोने,वन अधिकारी उमेश जंगम आणि पालिका मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी माथेरान पर्यटन बचाव समिती कडून सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि व्यापारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.मागील महिनाभरात प्रशासनाचे वतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही शहरात येणारे पर्यटक यांची बदनामी करणारे यांची झालेली नाही.त्याचवेळी बहुसंख्य ठिकाणी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहेत. तर बदनामी होत असलेल्या दस्तुरी प्रवेशद्वार येथे पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही.

वन जमिनीमध्ये घोडे बांधले जात असून त्यामुळे झाडे तुटली जात असताना वन विभाग शांत आहे.पार्किंग हद्दीत प्रवासी घोडे नेण्याचे बंद झालेले नाही आणि पालिकेने घोडे,हातरिक्षा,हमाल यांची दरपत्रक निश्चित केलेले फलक लावले नाहीत.यामुळे पर्यटन बचाव समिती संतप्त झाली असून माथेरान मधील प्रशासनाला शहराचे पर्यटन वाचावे यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचे दिसून येत असल्याने उद्यापासून माथेरान बंद ठेवण्यात येणार असल्याचे निर्णय माथेरान पर्यटन बचाव समितीने घेतला.

फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने काय करावं ?

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटकांची फसवणूक थांबावी आणि पर्यटकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.त्यात माथेरान दस्तुरी प्रवेशद्वार येथे असलेल्या टॅक्सी स्टँड पासून लोखंडी डॉम पर्यंत एकही एजंट,घोडेवाले,हमाल,रिक्षा चालक यांनी येऊ नये.पर्यटकांनी प्रवासी वाहन कर भरल्यावर डोम मध्ये शेवटी माथेरान पालिकेचे माहिती केंद्र विविध प्रकारचे दरपत्रक असावे आणि त्यापुढे घोडे,रिक्षा,हात रिक्षा आणि हमाल यांचे प्रीपेड स्टॉल असावेत.जेणेकरून पर्यटकांना रीतसर माहिती मिळेल आणि पर्यटकांची फसवणूक होणार नाही.

असा असेल बंद..

माथेरान बंद काळात कोणतेही व्यवहार सुरू असणार नाहीत. पर्यटकांनी आपली गैरसोय होईल त्यासाठी आधी माहिती घेऊन माथेरान येण्याचे नियोजन करावे.उद्या १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिक,व्यापारी यांनी एकत्र जमायचे असून श्रीराम चौकात सर्वांची बैठक होईल आणि पुढील निर्णय होतील.

अजय सावंत.. माजी नगराध्यक्ष,सभापती माथेरान नागरी पतसंस्था

दस्तुरी प्रवेशद्वार येथे एजंट लोकांकडून जाणीवपूर्वक माथेरानची चुकीची माहिती दिली जात आहे.त्यामुळे पर्यटक अर्ध्या दिवसांनी घरी परतण्यास निघतो,त्यामागे काही षडयंत्र आहे काय असा संशय येत असून माथेरान मध्ये कोणत्याही प्रकारची शेती नसल्याने येथील पर्यटन बहरावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Raigad matheran closed from tomorrow matheran tourism rescue committee big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Karjat
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार
1

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
2

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार
3

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
4

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.