Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : एक पाऊल विकासाच्या दिशेने ; ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळा सौर दिव्यांनी उजळली

कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गावात चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2025 | 01:32 PM
Raigad News : एक पाऊल विकासाच्या दिशेने ; ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळा सौर दिव्यांनी उजळली
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गाव हे मुंबई पुणे रेल्वेमार्गातलगत वसलेलं आहे. कर्जतची हद्द असलेलं हे शेवटचे गाव असल्याचं म्हटलं जातं. या ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आवार सौर दिव्यांनी उजळून गेले आहे. चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत.दरम्यान, शाळेच्या आवारातील रात्रीच्या वेळी दिव्याचा उजेड पाहून हे सौर दिवे कोणी बसवले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन ठाकूरवाडी हे गाव असून बीड ग्रामपंचायत मध्ये असलेल्या या गावातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा रात्रीच्या वेळी अंधारात असते.शाळेच्या परिसरात मोठी मोकळी जागा असून देखील रात्रीच्या वेळी अंधार असल्याने तेथे गप्पा मारण्यासाठी किंवा कोणते खेळ खेळण्यासाठी कोणालाही बसता येत नाही.ही समस्या चिराग फाऊंडेशन या संस्थेकडे राज्यातील प्रयोगशील शिक्षक वेच्या गावित यांच्याकडून उपस्थित करण्यात आली होती.त्यानंतर चिराग फाऊंडेशन चे काही पदाधिकारी स्टेशन ठाकूरवाडी मध्ये आले आणि त्यांनी गावाची पाहणी केली.गावात वीज आहे पण गावातील लोकवस्ती मधील चौक हे कायम अंधारात आहेत,तसेच शाळेच्या आवारातील अंधार पाहून एक नाहीतर चक्क सहा सौर ऊर्जेवर चालणारी दिवे भेट देण्याचा निर्णय या फाउंडेशनने घेतला.

मोलमजुरी करणारे स्टेशन ठाकूरवाडी गावातील ग्रामस्थ दिवसा बाहेर असतात. त्यांच्या अनुपस्थितीत चिराग फाऊंडेशन चे कार्यकर्ते सोलर पॅनल घेवून पोहचले आणि त्यांनी सिमेंट खडी यांच्या साहाय्याने सर्व सहा सौर दिवे बसवून गावातून आपले कामाचे ठिकाण गाठले.इकडे गावात सायंकाळी घरी पोहचले ग्रामस्थ गावातील पाच चौकात बसविलेले आणि रात्री साडे सात वाजता नेहमीच्या अंधाराच्या ठिकाणी दिव्याचा प्रकाश पाहून आनंदले.त्यात गावातील जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोविंद शांताराम कवटे यांना शाळेचे आवार दिव्याने उजळलेले पाहून आनंद झाला.या गावातील शाळेवर प्रेम करणारे राज्याच्या पुस्तक मंडळावर असलेले शिक्षक वेच्या गावित यांना संपर्क केल्यावर सौर दिवे कोणी बसवले याचे गुपित उलगडले आहे. शाळेतील संजय राठोड, ज्ञानेश्वर येळदरे याकामी सहकारी शिक्षकांचे योगदान मोलाचे राहिले आहे.

आम्हाला सौर दिव्यांचे महत्व गावातील चौका चौकात लावलेले दिवे यांच्यामुळे कळले आहे.ते दिवे बसविणारे यांना आम्ही शारीरिक मदत करू शकलो नाही की ते सोलर पॅनल उभारले जात असताना श्रमदान करू शकलो नाही अशी खंत आम्हाला लागून राहिली आहे.मात्र जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही चिराग फाऊंडेशन चे अधिकारी यांना बोलावून घेऊ आणि त्यांचा आदर सत्कार करू, असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title: Raigad news a step towards development karjat thakurwadi zilla parishad school lit up with solar lamps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News
  • Solar Project
  • ZP School

संबंधित बातम्या

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार
1

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
2

Raigad News : आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट; नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार
3

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
4

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.