औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबलेच पाहिजे अन्यथा...; कर्जतमध्ये हिंदू समाज आक्रमक
कर्जत/ संतोष पेरणे : हिंदूंची घरं मंदिर नष्ट करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर येथून हलवून देशाबाहेर फेकली पाहिजे आणि त्याचे उद्दतीकरणा देखील थांबले पाहिजे अशी मागणी अखिल हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.कर्जत येथे अखिल हिंदू यांच्या वतीने एकत्र जमत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
फाल्गुन कृष्ण तृतीय या दिवशी तिथीप्रमाणे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीही औचित्य साधून राज्यभरात अखिल हिंदू यांच्याकडून निवेदन देण्यात येत आहे. कर्जत तहसील कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून सर्व हिंदूंना आवाहन करण्यात आले होते. “क्रूरकर्मा हिंदू धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव”, अशी मागणीसाठी हिंदू नागरिकांनी कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. कर्जत प्रखंड मंत्री अनंता हजारे ,बजरंग दल संयोजक नितीन पवाळी,सह मंत्री केदार भडगावकर,अमोल ओसवाल, निनाद बिडकर ,यतीन भोसले आणि विविध राजकीय पक्षाचे तालुका आणि जिल्हा कार्यकर्ते हे उपस्थित होते. या नंतर मोठ्या संख्येने आलेल्या हिंदू समाजाने आपल्या मागणीचे निवेदन शासनाला देण्यासाठी देण्यात आले.त्यावेळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक विशाल जोशी यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून आज सर्व महाराष्ट्रात या विषयी आंदोलन करणयात येत आहे. वास्तविक जे थडगे ही हिंदूंचे विजयाचे प्रतिक आहे, त्याचे जर जिहादी मानसिकतेची लोक अनैतिक उदात्तीकरण करत असतील तर ते थडगे हे उखडून महाराष्ट्रातुन नव्हे तर भरतातून हटवले पाहिजे अशी मागणी केली.बजरंग दलाचे जिल्हा मंत्री साईनाथ श्रीखंडे यांनी हिंदू समाजासाठी छत्रपती शिवजी महाराज हे दैवत आहे.
आज आपल्या राजाच्या जयंतीच्या दिवशी सर्व हिंदू समाज क्रूरऔरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एकत्र आला आहे. राज्यभरात एकावेळी झालेल्या आजच्या या लढ्याने सरकारने धडा घेतला नाही तर पुढील लढ्यात संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली असेल असा निर्धार बोलून दाखवला.तर सनातन संस्थेचे विजय देशमुख अधिवक्ता अमोल सूर्यवंशी आणि ह भ प दीपक महाराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.