
Raigad News: इच्छुक उमेदवारांचा हिरमोड! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?
सर्वोच्च न्यायालयाने राज्य संस्थांच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण निवडणूक घ्या, असे आदेश दिले होते. मात्र ती अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या तरी होताना दिसत नाही. त्यातच पुढल्या महिन्यात बारावी बोर्ड, त्यानंतर दहावी बोर्डाच्या परिक्षा होणार आहेत. यामुळे या निवडणूका या महिन्यात होणार की नाही? हा प्रश्न सर्व राजकीय पक्षांना पडला असून सध्या राज्य निवडणूकीच्या हलचलीकडे लक्ष लागून राहिलं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळुन नगराध्यक्षा सह ४ नगरसेवक निवडून आले तर उद्धवसेना पक्षांचे ४ नगरसेवक, तर शिंदे शिवसेना पक्षांकडून ११ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ नगरसेवक निवडून आलेत. हीच आघाडी व महायुती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत असणार की अजुन नवीन समीकरणे जुळणार हे पाहावे लागणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद कधी घेणार? याकडे लक्ष आहे.
मुरूड तालुक्यातील २ जिल्हा परिषद तर ४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आसुन याकरिता जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवारांची नावे ही जवळ-जवळ निश्चित झाली आहे. प्रत्येक उमेदवारांच्या पक्षांकडून गावा-गावात धार्मिक, सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम घेत आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या मुरुड जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत अजित पवार राष्ट्रवादी गट व उद्धवसेना पक्षांनी आघाडी केली होती. तर शिंदे शिवसेना गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी महायुती करुन निवडणूकीला सामोरे गेले होते.