Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Sakharchauth Ganpati : पेण तालुक्यातील बोरी येथील हनुमान क्रीडा मंडळाने साकारलेला साखरचौथ गणपतीचा देखावा यंदा मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचा जागर करणारा ठरत आहे. विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांच्या प्रतिमा आणि ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून मराठी समाजाचे कर्तृत्व नव्या पिढीसमोर मांडण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 30, 2026 | 06:25 PM
इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा संदेश
  •  विविध मान्यवरांच्या प्रतिमा आणि सजावटी
  • नव्या पिढीला स्वाभिमानाची प्रेरणा
Sakharchauth Ganpati : मराठी अस्मिता आणि इतिहासाचा जागर करणारा साखरचौथ गणपतीचा देखावा हा पेण तालुक्यातील बोरी येथील हनुमान क्रीडा मंडळाने साकारलेला यंदाचा साखरचौथ गणपतीचा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार, गायक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मराठी कर्तृत्वाची मांडणी करताना ऐतिहासिक संदर्भ आणि वर्तमानातील सामाजिक परिस्थितीवरही व्यंगातून भाष्य या देखाव्यात करण्यात आले आहे. यंदाचे हे 34 वे वर्ष असून गेल्या तीन पिढ्यांची एकजूट हे या मंडळाचे वैशिष्ट्य ठरले आहे. या देखाव्याची सजावट विनीत तांडेल व आशिष नाईक, तर मूर्ती सूरज पाटील व चैतन्य म्हात्रे यांनी साकारली आहे.

मराठी माणसाची प्रगतीव सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक योगदान तसेच देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारा तसेच हा देखावा आहे. या देखाव्यात इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानातील सामाजिक परिस्थिती यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे

लेखक, साहित्यिक, गायक, कलाकार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा आणि फ्रेम्सच्या या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. या देखाव्यात मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यात आला आहे.

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा संदेश

गेली 34 वर्षे हनुमान क्रीडा मंडळाच्या साखरचौथ गणपती उत्सवाचे हे 34 वे वर्ष आहे.विशेष म्हणजे गेल्या तीन पिढ्यांपासून मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या एकजुटीने हा गणेश उत्सव साजरा करतात त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर जनजागृती करतात. याला एक व्यासपीठ म्हणूनही या उत्सवाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विविध क्षेत्रांतील मराठी कर्तृत्वाचा जागर या वर्षीच्या देखाव्यात चित्रपट, नाट्य, साहित्य, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत मराठी माणसाने केलेल्या उल्लेखनीय वाटचालीचे दर्शन घडविण्यात आले आहे.

 विविध मान्यवरांच्या प्रतिमा आणि सजावटी

माध्यमातून बुद्धिमत्ता, कष्ट, कल्पकता आणि नेतृत्वाच्या जोरावर मराठी समाजाने निर्माण केलेले स्थान अधोरेखित करण्यात आले आहे.
‘मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात गेला तरी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवू शकतो’, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. मराठी माणसाचे पाऊल सातत्याने प्रगतीच्या दिशेने पुढे पडावे, अशी भावना या संकल्पनेमागे असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

‘दिल्लीचे तख्त राखते’पासून ‘शेवटी मधान्द तख्त फोडते मराठी’पर्यंत व्यंग मराठ्यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा संदर्भ देताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढील काळातील मराठा सत्तेच्या विस्ताराची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखाव्यात मांडण्यात आली आहे. दक्षिणेपासून उत्तर भारतापर्यंत मराठा सत्तेचा झालेला विस्तार आणि दिल्लीच्या राजकारणातील मराठ्यांची भूमिका याची आठवण या माध्यमातून करून देण्यात आली आहे.

याच ऐतिहासिक संदर्भाला वर्तमान परिस्थितीशी जोडताना ‘शेवटी मधान्द तख्त फोडते मराठी’ असे उपहासात्मक वाक्यही देखाव्यात मांडण्यात आले आहे. इतिहासातील मराठ्यांच्या प्रभावाची आणि आजच्या काळातील मराठी भाषा व मराठी माणसासमोरील आव्हानांची सांगड घालत या व्यंगातून सामाजिक भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न देखाव्याची सजावट करणारे विनीत तांडेल यांनी मराठी अस्मिता, इतिहास आणि वर्तमानातील मराठी समाजाची वाटचाल या तिन्ही बाबींचा विचार करून देखावा साकारला आहे. इतिहासात मराठी माणसाने पराक्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्याचवेळी आज मराठी भाषा आणि संस्कृतीसमोरील आव्हानांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता यांचे जतन करणे ही केवळ एका पिढीची जबाबदारी नसून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

नव्या पिढीला स्वाभिमानाची प्रेरणा

साखरचौथ गणपतीच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेबरोबरच इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधणारा हा देखावा बोरी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगत आधुनिक क्षेत्रांतही नव्या पिढीने पुढे जावे आणि मराठी अस्मिता जपत प्रगतीची वाटचाल करावी, अशी अपेक्षा या देखाव्यातून व्यक्त करण्यात आली आहे. तीन पिढ्यांची एकजूट 34 वर्षांची उत्सव परंपरा आणि मराठी अस्मितेचा जागर यामुळे बोरीतील हनुमान क्रीडा मंडळाचा साखरचौथ गणपती उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता इतिहास, संस्कृती, कर्तृत्व आणि सामाजिक जाणिवेचा जागर करणारा उत्सव ठरत आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

Web Title: Sakharchauth ganpati bori marathi asmita history ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Festival
  • Raigad News

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
2

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
4

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.