Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक ; कर्जतमधील महिला प्रवासी गंभीर जखमी

चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करणारी महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. अज्ञातांनी कल्याण स्थानक परिसरात दगडफेक केल्याने या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2025 | 12:51 PM
धावत्या चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक ; कर्जतमधील महिला प्रवासी गंभीर जखमी

धावत्या चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक ; कर्जतमधील महिला प्रवासी गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

कर्जत / संतोष पेरणे :   लांब पल्ल्याच्य़ा गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा घटना वारंवार घडताना दिसत आहे.  चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या गाडीवर दगडफेक झाली आणि गाडीतून प्रवास करणारी कर्जत येथील तरुणी यामध्य़े गंभीर जखमी झाली आहे .दगडफेकीबद्दल संबंधित महिला प्रवासी यांनी कर्जत येथे रीतसर तक्रार नोंदवली असून कर्जत पॅसेंजर असोसिएशनकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.  4 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवरील दगडफेकीत कर्जत येथील 24 वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी गंभीर जखमी झाली.तेजस्विनी बाळाराम भोईर या प्रवासी तरुणी ठाणे येथील एका शिपिंग कंपनीत ज्युनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ती दररोज चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसने ठाणे ते कर्जत असा प्रवास करते. 4 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सात वाजता त्या ठाणे स्थानकातून महिलांच्या डब्यातून खिडकी शेजारील सिटवर बसुन आपल्या मैत्रींणींसह प्रवास करत होती.

कल्याण स्थानक पार करून एक्सप्रेस विठ्ठलवाडी स्थानकाच्या पुढे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आली असता अचानक डाव्या बाजूने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगड भिरकावला. हा दगड खिडकीतून आत येऊन तेजस्विनी हिच्या डोक्याला जोरात लागला. या धक्क्यातून ती सावरते न सावरते तोच रक्तस्राव सुरू झाला. या घटनेमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये घबराट उडाली. काही प्रवाशांनी तत्काळ ट्रेनची चैन खेचली, त्यामुळे गाडी विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान थांबली.यानंतर ट्रेन मॅनेजरने सदर माहिती रेल्वे प्रशासनाला दिली आणि गाडीतच तीच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत येथे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे. धावत्या रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या घटनांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत.गाडी कर्जत स्थानकात पोहोचल्यानंतर स्टेशन मास्तर यांनी या घटनेचा मेमो तयार केला. कर्जत रेल्वे जिआरपीच्या कर्मचाऱ्यांनी तेजस्विनी हिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटना नवी नाहीत. यापूर्वीही पनवेल स्थानकानंतर प्रगती एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याने एका प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झाला होता. मात्र, अशा घटनांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे.रेल्वे प्रशासन आणि सुरक्षायंत्रणांनी यापुढे तरी जागरूक राहावे आणि या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यातअशी मागणी केली आहे.

कर्जत पॅसेंजर असोसिएशन कडून मागण्या

अज्ञात आरोपींचा त्वरित शोध घ्यावा व कठोर कायदेशीर कारवाई करावी.दगडफेकीच्या घटना ज्या भागांमध्ये वारंवार घडतात, त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानिक पोलिसांची नियुक्ती करावी.
जखमी प्रवाशांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी.

Web Title: Stones pelted at running chennai superfast express female passenger from karjat seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • chennai
  • express news
  • kalyan
  • Karjat

संबंधित बातम्या

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
1

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
3

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.