Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेण तालुका हादरला! निकृष्ट बंधाऱ्यामुळे कणे गावात पूर; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

रायगडच्या पेण तालुक्यातील कणे येथील ८.८ कोटींचा खारभूमी बंधारा पहिल्याच पावसात फुटल्याने २२०० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी गुडघाभर पाण्यातून पाहणी करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 03:55 PM
पेण तालुका हादरला! निकृष्ट बंधाऱ्यामुळे कणे गावात पूर; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
Follow Us
Follow Us:
  • पेण तालुका हादरला!
  • निकृष्ट बंधाऱ्यामुळे कणे गावात पूर
  • जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
पेण: रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे व पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कणे येथील पूरपरिस्थिती पाहणी केली. कणे खारभूमी बंधरा फुटल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कणे ता. पेण या गावात भेट देऊन पुरपरीस्थीतीमुळे ज्या घरांमधे पाणी शिरले अशा सर्व घरातील कुंटुबाची भेट घेऊन तातडीने मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आदेश दिले. गावाबाहेरचे जे जे ग्रामस्थ स्थलांतरीत करुन त्यांचे नातेवाईक व इतरांना कणे प्राथमीक शाळेत आणले. त्यांची आस्थेने विचारपूस करुन सर्वोतोपरी तातडीची मदत देण्याचे संबधीताना आदेश दिले. याचबरोबर खारभूमी बंधाऱ्याचे निकृष्ट कामाची चौकशी करुन संबधीत अधिकारी, ठेकेदार दोषी ठरले तर संबधितावर कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन ग्रामस्थांना दिले असून कणे शेत शिवारातील वढाव व बोर्झे ओढांगी परिसरातील सुमारे २२०० एकर भातशेती मधील रोपवाटीकांची पाण्यात कुजून गेल्या आहेत अशा सर्व शेतक-यांना कृषी विभागाकडून अहवाल मागवून बी बियाणांची पूर्तता करण्याचे देखील आश्वासन जिल्हाधाका-यांनी दिले. खारभूमी‌ विभागातील अधिका-यांनी कणे खारभूमीचे केलेले निकृष्ट कामाबाबत केलेले दुर्लक्षीतपणा आता संबधीत विभागातील अधिकारी वर्गाला अडचणीत आणणारा ठरणार आहे.

कणे कोप्रोली खारभूमी योजनेचा बंधारा २०१९ आलेल्या महापूरात फुटून मोठ आर्थीक नुकसान गावक-यांना सोसावे लागले होते. या परिस्थीतीची गांर्भियाने दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या कोकण आपत्ती सौमिकरण योजनेतून बंधारा मजबूतीकरणा साठी प्रस्ताव दाखल करण्याचे खारभूमी सर्वेक्षण अन्वेशन विभागाला सांगीतले होते. त्यानुसार केंद्र व राज्यसरकारने यासाठी विशेष तरतूद करुन पाच किलोमीटर लांबीचा या बंधा-यासाठी ८.८०० कोटी निधीची तरतूद उपलब्ध करुन यांचे टेंडर प्रोसेस कार्यारंभ आदेश होऊन २०२४ पासून मे २०२६अशा दोन वर्षात हे काम पूर्ण केले असून या कामाबाबत अधिकारी व ठेकेदार यांनी केलेला दुर्लक्षित पणावर अनेकदा गावक-यांनी या निकृष्ट कामाबाबत तक्रार निवेदन दिली आहेत.

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

खारभूमी अधिका-यांसोबत बैठकांमधे ठेकेदाराने केलेले निकृष्ट कामाबाबत दोषारोप करुन देखिल कार्यकारी अभियंता विजय पाटील, उप अभियंता भोईर, शाखा‌ अभियंता अश्वीनी पाटील यांनी केलेला दुर्लक्षीतपणाची किमंत गावातील शेतकरी बांधवाना भोगावी लागली. गावातील ९५० एकरावरील रोपवाटीका पाण्याखाली जाऊन कूजल्या. आता शेतीची लागवड कशी करणार, महागडे बी बियाणे, खतांचा मारा यांची नुकसानीस कारणीभूत ठरला आहे तो खारभूमी विभाग. आलेल्या विकासनिधीचा योग्य वापर न करता इस्टिमेटनुसार मटेरिएल न केलेला वापर बंधा-याचे मजबूती करण्यासाठी शेततलावातील मातीचा सर्रास वापर यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बंधारा मजबूती करताना रूंदीकरणात उंची दगडी मुरुमाचा कमी वापर यामुळे पाऊस आला धाऊन बंधारा गेला वाहून अशी अवस्था झाली असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी मुसळधार पाऊस असताना देखील तब्बल तासभर थांबून गुडघाभर पाण्यातून पोलीस अधिक्षक ऑंचल दलाल, जिल्हा परिषद सिईओ नेहा भोसले, प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी जालंदर नालकुल, सहाय्यक पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यासह संयुक्त पहाणी करुन आपत्तीग्रस्थ ग्रामस्थांना सर्वोतोपरी तातडीने मदत करण्याचे ठोस आश्वासन दिले. ग्रामस्थांनी पोलीस व आपत्ती यंत्रणेने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी यांना माहिती देत सर्व यंत्रणाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Web Title: Substandard check dam causes flooding in kane village district collector and superintendent of police inspect the site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • flood
  • Maharashtra Rain
  • pen

संबंधित बातम्या

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार
1

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिके संकटात, रब्बीच्या पेरणीवरही टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.