Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
दरम्यान, गेल्या दोन चार दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे महाड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलस्रोतांमध्ये पाणीसाठा वाढू लागल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सावित्री नदीवरील रानबाजीरे धरण ओव्हरफ्लो झाले असून, त्याचा लाभ महाड एमआयडीसी क्षेत्राला होणार आहे. तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे व कुर्ले धरणांतील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, कोथुर्डे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी, जलसाठ्यातील वाढ लक्षात घेता लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या कुर्ले धरणातील पाणीसाठाही समाधानकारक वाढला असून, त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भीषण पाणीटंचाईच्या काळात नडगाव हद्दीतील खाण तलावातील पाणी टँकरद्वारे करंजखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून शहराला पुरविण्यात आले. या पर्यायी व्यवस्थेमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. भविष्यात या तलावाच्या पाण्याचे दीर्घकालीन योजनेत रूपांतर झाल्यास महाडच्या टंचाईवर कायमस्वरूपी मात करणे शक्य होईल, असे मत व्यक्त होते.
२ दिवसांच्या पावसामुळे समाधानाचे वातावरण निर्माण असून, शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. महाड नगरपरिषद व पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, शहरात नियमित पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले आहे. जून महिन्यात पावसाची तूट राहिली असली, तरी महाडमध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा जुलै महिना ही तूट भरून काढेल, जलस्रोत अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा होत असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






