खोपोली/ प्रवीण जाधव : दिवाळी म्हटलं की कर्मचाऱ्यांसाठी बोनस हा आलाच. मात्र नगरपरिषदेच्या कमर्चाऱ्यांना दिवाळी तोंडावर आली असूनही बोनस न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळी बोनस देण्याचे निश्चित झाले. मात्र दिवाळी उजाडली तरी प्रशासनाकडून कोणतीच तजवीज न झाल्याने आज सकाळी सात वाजल्या पासून सर्व कर्मचारी आत्यावश्यक सेवा फक्त सुरु ठेऊन संपवर गेले होते. शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची चांगलीच कान उघडणी करून बोनस तात्काळ देण्याचे आदेश दिले होते.
खरं तर हा विषय जेव्हा आमदार माहेंद्र थोरवे यांच्या कानी गेल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना दूरध्वनी करून चांगलेच सुनावले व कर्मचाऱ्यांना तात्काळ दोनस देण्याचे आदेश दिले पण आज दिवाळीचा पहिला दिवस आला तरी बोनस न मिळाल्याने आज भारतीय कर्मचारी कामगार महासंघ या युनियन अध्यक्ष किशोर पानसरे यांच्या नेतृत्वात संप पुकारला.
त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक मोहन औसरमल यांनी आंदोलक कामगारांची भेट घेतली व प्रशासनाशी चर्चा करून आजच्या आज बोनस दिला जाईल असा निर्णय घेतला.प्रसाकीय अधिकार्यानी युनियन नेते व प्रकतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि सकारात्मक मार्ग काढीत आजच्या आज बोनस कामागारांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले तेव्हा बोनस मिळणार या खुशीने युनियन अध्यक्ष किशोर पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व कामगारांना कामावर तात्काळ रुजू होण्यास सांगितले आणि अखेर संप मिटला.