
Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण
उरण शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूककोंडी आता चिघळत चालली आहे. शहरातील मुख्य चौक, कोटनाका परिसर, सिडको कॉलनी, एस.टी. स्टैंड परिसर या भागांत सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची मोठी रांग लागते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सिडकोने उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग उभारण्याचे घेतला आहे, मात्र या कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याने प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण होणार की नाही, यावाचत शंका निर्माण झाली आहे.
उरण हे रायगड जिल्ह्यातील छोटे शहर असले तरी गेल्या दोन दशकांत औद्योगिक तसेच नागरी विकास झपाट्याने वाढला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर, ओएनजीसी, कंटेनर डेपो, लॉजिस्टिक कंपन्या तसेच नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या भागातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर कोटनाका परिसरात विशेषत: प्रवासी वाहतुकीची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे हा भाग वाहतूक कोंडीचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रस्ता वेळेत पूर्ण झाला तर शहरातील कोडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, पण कामाच्या विलंबामुळे समस्या अधिकच वाढत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानीय प्रशासन आणि सिडको अधिकाऱ्यांकडून मात्र काम लवकर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केल्याचे सांगितले जात आहे. बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यानंतर उरण शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र उड्डाणपुलाच्या विलंबामुळे हा दिलासा काही महिन्यांसाठी लांबणीवर गेला आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”; महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
सिडकोने हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते. प्रारंभीचे काम वेगाने सुरू असले तरी उड्डाणपुलाच्या बांधकामाचा वेग अत्यंत मंदावला आहे. त्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यावसायिकांनी कामातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूककोंडीमुळे रोजच्या प्रवासात मोठा वेळ वाया जात असल्याचे अनेकजण सांगत आहेत.
सिडकोने नियोजित केलेला बाहह्यवळण मार्ग हा उरण शहरातून जाणारा वाहनांचा ताण कमी करेल. हा रस्ता थेट पनवेल-उरण महामार्गाला जोडला जात असल्याने शहरातून जाणाऱ्या ट्रॅफिकला पर्यायी मार्ग मिळणार आहे. अडचणीमुळे आणि कंत्राटदारांच्या विलंबामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीवरील रस्त्याचे काम वेगाने सुरू असून काही भागांत अंतिम टप्यात पोहोचवले आहे, मात्र या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम तांत्रिक अडचणीमुळे आणि कंत्राटदारांच्या विलंबामुळे मागे पडत आहे.