Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug News : अन् धोका टळला…, रेवदंडा पुलानजीक बुडालेली धोकादायक बार्ज हटविण्याची प्रक्रिया सुरू 

कुंडलिका समुद्र मार्गे प्रवास करताना रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेले काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली नव्हती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 01:07 PM
अन् धोका टळला..., रेवदंडा पुलानजीक बुडालेली धोकादायक बार्ज हटविण्याची प्रक्रिया सुरू

अन् धोका टळला..., रेवदंडा पुलानजीक बुडालेली धोकादायक बार्ज हटविण्याची प्रक्रिया सुरू

Follow Us
Close
Follow Us:

रेवदंडा, महेंद्र खैरे : रेवदंडा पुलानजीक गेल्या काही वर्षांपासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून जा-ये करणाऱ्या इतर लहान-मोठ्या बोटी, बार्ज यांना धोकादायक ठरत आहे. मात्र आता हीच धोकादायक बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

मच्छीमार होडया तसेच छोटया मोठया बार्ज यांना कुंडलिका समुद्र मार्गे प्रवास करताना रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

“तर बुधवार पेठेचे नाव…”; पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरुन ठाकरे गटाचा खासदार मेधा कुलकर्णींवर निशाणा

रेवदंडा पुलानजीक गेले काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर न काढल्याने तेथून ये-जा करणारा इतर लहान मोठया बोटी बार्ज यांना धोकादायक ठरत होती. परिणामी मच्छीमार व्यावसायीकांनी ही नाराजी व्यक्‍त केली होती.  बार्ज समुद्र भरतीचे वेळी पुर्णतः बुडत असल्याने रेवदंडा समुद्र किनारी कुंडलिका समुद्र खाडीत ये-जा करत असलेल्या लहान मोठया बोटी, बार्ज यांचे निदर्शनास येत नव्हती. परिणामी पाण्यातील बुडालेल्या बार्जला धडक बसून अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती.

गेले अनेक वर्षे संबंधितांनी समुद्रात बुडालेली बार्ज काढण्याची कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे येथून जा-ये करताना बोटी, बार्ज यांना सावधानता बाळगावी लागत होती. तसेच कुंडलिका समुद्र खाडीत नवीन बोट अथवा बार्ज येथून जा-ये करत असल्यास बुडालेली बार्ज भरतीचे वेळी दिसत नसल्याने व बुडालेल्या बार्ज बद्दल माहिती नसल्याने अपघाताची शक्यता होती. याबाबत बंदर रेवदंडा बंदर निरिक्षक सतिश देशमुख यांचेशी संपर्क केला असता, समुद्रात बुडालेली बार्ज काढून घेण्याबाबत संबधीत बार्ज मालकास सुचना केली आहे. मात्र याबाबत बार्ज मालकांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य दिले नसल्याचे म्हटले होते. मात्र संबधीत बार्ज मालकांनी सदर बार्ज काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने स्थानिक मच्छीमार व्यावसायीकानी समाधान व्यक्‍त केले आहे.

अलिबाग पनवेल विनावाहक बसचा जिते गावाजवळ अपघात

तर दुसरीकडे अलिबाग बसस्थानकातून बुधवार (२५ जून) सकाळी ६:४५ वाजता अलिबागवरून सुटलेली अलिबाग ते पनवेल विनावाहक बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली.  एम एच ०६ बी डब्ल्यू ४३७३ क्रमांक असलेली  शिवसाई बसचा मुंबई गोवा महामार्गावर पेण ते पनवेल दरम्यान जिते गावाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रकला पाठीमागून ठोकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या आहेत तर काही प्रवाशांना मुका मार लागला असल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांनी दिली आहे. अपघातानंतर बसचा दरवाजा उघडता येत नसल्याने सर्व प्रवाशांना ड्रायव्हर बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज; ग्रामपंचायतीसह सर्व यंत्रणा ‘अ‍ॅक्टिव्ह’

Web Title: The process of removing the dangerous barge that has sunk near the revdanda bridge has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • Alibaug
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
1

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन
2

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु
3

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश
4

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.