Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल, असे मंत्री भरणे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2025 | 07:19 PM
Raigad News: "दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे..."; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Raigad News: "दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे..."; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

१. सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकर सुरू करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश
२. दिवेआगर संशोधन केंद्र पर्यटनाला चालना देणारे ठरणार
३. दिवेआगार हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण

मुंबई: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रुपयांची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह इतर अधिकारी या उपस्थित होते.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल. या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील असे नियोजन करावे. सुपारी संशोधन केंद्रासाठी निधी मंजुर असून प्रस्तावित बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबीं पूर्ण होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दिवेआगर संशोधन केंद्र पर्यटनाला चालना देणारे ठरेल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,दिवेआगार हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण असून येथे निर्माण होणारी रोठासुपारी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वाण आहे. हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवीन सुपारी संशोधन केंद्र महत्वाची भुमिका बजावेल. तसेच पर्यटक देखील सुपारी संशोधन केंद्राला भेट देतील अशा दृष्टीने प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्र तयार करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

Web Title: Minister bhrne said work betel nut modification center at diveagar should be started early diveagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Agriculrture News
  • Dattatray Bharne
  • raigad

संबंधित बातम्या

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
1

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
2

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन
3

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
4

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.