कर्जत/ संतोष पेरणे : मुंंबई पुणे रेल्वे प्नवास आता आणखीच सुखकर होणार आहे. कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे घाटातून जातत असताना इंजिनच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे घाटातून जाताना बराच वेळ जातो. याचसमस्येवर तोडगा काढण्यासाठी
कर्जत आणि लोणावळा भागातील मध्य रेल्वे मार्गावर बोगदा काढण्याचा प्रस्ताव खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनासमोर मांडला होता. या प्रस्तावाला मध्य रेल्वेच्या महाव्यव स्थापकांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.दरम्यान,खासदार बारणे यांच्याकडून कर्जत,पनवेल आणि उरण तालुक्यातील रेल्वे प्रश्नांवर ही बैठक बोलाविली होती.
याचपार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार धैर्यशील मोहिते, रल्वे महाप्रबंधक मुंबई धर्मवीर मीना, मध्य रेल प्रबंधक हिरेश मीना, उपमहाप्रबंधक मुंबई के. के. मिश्रा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्र नाथ चौधरी,प्रधान मुख्य परिमंडळ प्रबंधक श्याम सुंदर गुप्ता, प्रधान मुख्य अभियंतता रजनीश मथुर, मुख्य अभियंता निर्माण एन टी पी दिव्याकांत चंद्रकार, प्रधान मुख्य विद्युत अभियंता अनुप कुमार अग्रावर, उपस्थित होते.
या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. मुंबई विभाग अंतर्गत मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल,कर्जत, उरण,नेरळ ही रेल्वे स्थानके येतात. कर्जत रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.त्याचा डीपीआर तयार असून ओव्हर ब्रीजच्या कामाला गती द्यावी.खोपोलीत पर्यटन मोठ्या संख्येने येतात.त्यामुळे त्या स्थानकाचा विकास करावा.
कर्जत लोणावळा इंजिनच्या समस्येमुळे बराच वेळ वाया जातो. त्यामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे.त्यासाठीचा 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा (डीपीआर) तयार आहे.हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हा टनेल करण्यासाठी आवश्यक ती मदत मदत करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याचे बारणे यांनी सांगितले.
Raigad News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ माथेरान मिनीट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार?
कर्जत, नेरळ, लोणावळा रेल्वे स्थानकावर सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा निर्माण करणे, प्रवाशांसाठी पाणी,स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात याव्यात. कोरोना कालावधीत लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकावरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याचे थांबे बंद करण्यात आले होते. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे द्यावेत, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. माथेरानला पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे माथेरान अमनलोज माथेरान ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाव्यात. अमृत भारत रेल्वे अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आढावा घेतला. त्या कामाला गती देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली आहे.