Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता
बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका
महाड पंचायत समितीकडून तालुक्यातील गावांना जानेवारी ते मार्च आणि त्यानंतरच्या एप्रिल, मे, जून महिन्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे, त्या गावांची पाहणी करून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन विंधन विहिरी मारणं, जुन्या विंधन विहीरींची दुरूस्ती, सार्वजनिक विहिरी खोल करणे आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला आहे. या टंचाई कृती आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च २०२६ अखेर २० गावे आणि १३२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून त्यासाठी अंदाजे ३९ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे. या गावातील १३२ वाड्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
याखेरीज खैरे त. तुडील, आदिस्ते खैरे, बेबलघर खैरे, तेलगे खैरे, कुबळे खैरे, वराठी खैरे या गावाची नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ३० लाख खर्च अपेक्षित आहे. वीर व दासगांव आणि दासगाव भोई वाडी, दासगाव परिटवाडी, दासगांव पेटकर वाडी, दासगांव जाधव वाडी, वीर भवानी वाडी, राजीवली वैभववाडी, राजीवली जंगमवाडी रेवतळे बौद्धवाडी, नरवण आदिवासी वाडी, गोंडाळे झांजेकॉड, वारंगी सुतार कोंड, कुसगांव गारपाटले, ताम्हाणे धनगरवाडी, चिभावे सुतार कौड येथे नवीन विंधन विहीर मारण्यासाठी १४ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे. तर कुंभे शिवथर व कोझर आणि ६ वाड्या येथे विंधन विहीर दुरुस्ती साठी २ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे.
वाकी बु., रानवडी खुर्द, आडी, डोंगरोळी, कोथुर्डे, तळीये, ताम्हाणे, कुभार्ड ही ८ गावे, वाकी बुद्रुक सोमजाई मंदिर, रानवडी खुर्द, कोथुर्डे कदमकोडा, मांडळे पारवाड़ी आदिवासीवाडी, पाचाड कुंभार बाव, निजामपूर हिरकणी वाडी, तळोशी कालकाई कोड, वारंगी, गौडाळे गौळवाडी, पिंपळकोंड गाणीची विहिर दासगाव बामणेकोड, दासगाव भैरी मंदिरा जवळ या १३ वाडयांमधील सार्वजनिक विहीरी खोल करण्यासाठी २१ लाख खर्च अपेक्षित आहे.






