Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; काही जिल्ह्यांत नद्यांना पूर तर नाशिकसह इतर ठिकाणी…

प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून विदर्भात पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होऊन विकेंडपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2025 | 07:12 AM
राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर

राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता राज्यातील काही भागांत मुसळधार होताना दिसत आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, नाशिक, वर्धा, अकोला, बुलढाणा, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. यशोदा नदीला पूर आल्याने मुले अडकल्याचे दिसून आले. तिन्ही मुले डिगडोह येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये थांबले होते. नंतर त्यांना वाचवण्यात यश आले.

यशोदा नदीच्या परिसरात शेडच्या आजूबाजूला पुराच्या पाण्याचा विळखा आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर दाखल झाले होते. मुलांना पुरातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बचाव पथकाचे कर्मचारी व देवळी येथील अग्नीशामक दलाचे कर्मचारी उपस्थित झाले. पुरात अडकलेल्या भावेश अमोल कापसे (वय १५, रा डीगडोह), उमेश रामदास साखरकर (वय ३८, रा. नागझरी), प्रज्वल पंडित सावरखेडे (वय ४०, रा नागझरी) या तिघांना वाचवण्यात आले आहे. तर एक दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून विदर्भात पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे मान्सून आणखी सक्रीय होऊन विकेंडपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.

बुलढाण्यात कालवा फुटून शेतीत पाणी

बुलढाणा जिल्ह्यात संततधार पाऊस होत असल्याने मेहेकर तालुक्यातील मारोती पेठ येथील लघु प्रकल्प तुडुंब भरला आहे. तसेच तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. मारोती पेठ येथील लघु प्रकल्पाचा कालवा फुटल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या आहेत. पेरणी झालेल्या शेती वाहून गेल्या आहेत. काही भागात पावसाने कहर केला आहे.

विदर्भात पावसाला सुरुवात

सलग दुसऱ्या दिवशी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. मात्र, बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा आहे. पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. २९ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे.

Web Title: Rain is increasing in many parts of the maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:12 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Weather Update : मान्सूनबद्दलची सर्वात मोठी अपडेट! यंदा पाऊस केव्हा, कुठे आणि किती कोसळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Weather Update : मान्सूनबद्दलची सर्वात मोठी अपडेट! यंदा पाऊस केव्हा, कुठे आणि किती कोसळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.