Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

दापोली, पुणे, अकोला आणि यवतमाळ येथे लहान खंड, कराड, पाडेगाव व निफाड येथे मध्यम खंड, तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर भागात मोठे खंड पडण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 06:11 PM
Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना 'हा' मोलाचा सल्ला

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना 'हा' मोलाचा सल्ला

Follow Us
Follow Us:

सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता
पावसाचे वितरण असमान राहणार
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला इशारा

सुनयना सोनवणे /पुणे: महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या ९८ टक्के  पाऊस पपडण्याची शक्यता असली तरी पावसाचे वितरण असमान राहणार असून अनेक भागांत मोठे पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा ज्येष्ठ कृषी  हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला.

माजी विभागप्रमुख, कृषी हवामानशास्त्र विभाग तथा कृषी हवामान फोरम साऊथ एशियाचे संस्थापक सदस्य असलेल्या डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत २०२६ चा मान्सून अंदाज जाहीर केला. मान्सूनचा अंदाज वर्तविण्याचे हे त्यांचे सलग २४ वे वर्ष आहे. त्यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या मान्सून पावसावर राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकरी अवलंबून आहेत. हवामान बदल, वाढते हरितगृह वायू, जंगलतोड आणि जागतिक स्तरावरील प्रदूषणामुळे मान्सूनच्या स्वरूपात सातत्याने बदल होत आहेत. यंदा राज्यात सरासरीच्या जवळपास पाऊस होण्याचा अंदाज असला तरी कमी दिवसांत अधिक पाऊस आणि त्यानंतर दीर्घ खंड असे चित्र राहण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय अंदाजानुसार पश्चिम विदर्भात ९७ टक्के, मध्य विदर्भ व मराठवाड्यात १०० टक्के, पूर्व विदर्भात ९६ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९६ टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९७.६ टक्के आणि कोकणात सरासरीइतका पाऊस अपेक्षित आहे. पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोली येथे सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा

मात्र दापोली, पुणे, अकोला आणि यवतमाळ येथे लहान खंड, कराड, पाडेगाव व निफाड येथे मध्यम खंड, तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर भागात मोठे खंड पडण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. काही भागांत आवर्षणसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते; मात्र नंतर पावसाच्या पुनरागमनाची शक्यता राहील. यंदा एल निनो किंवा सुपर एल निनोचा प्रभाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी तुलनेने कमी असल्याने पावसाचे वितरण विस्कळीत राहू शकते, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी डॉ. साबळे यांचा सल्ला –
– कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे.
– सोयाबीन, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी आणि ज्वारीची निवड करावी.
– कापूस, ऊस, हळद आणि आले यांसारखी अधिक पाणी लागणारी पिके टाळावीत.
– ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा.
– बाजरी-तूर, तूर-भुईमूग, कापूस-मूग अशी आंतरपीक पद्धत अवलंबावी.
– किमान ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
– जमिनीत दोन ते तीन फूट ओल गेल्यानंतर पेरणी करणे योग्य.
– कोकणात दोन टप्प्यांत लागवड करून आवश्यकतेनुसार पुनर्पेरणी करावी.

Maharashtra Rain Alert: यंदा वरुणराजाची अवकृपा? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ धोक्याचा इशारा

ठळक मुद्दे –
– राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज
– मोठ्या धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता
– कमी दिवसांत जास्त पाऊस, नंतर मोठे खंड
– एल निनोचा सध्या प्रभाव नाही
– इंडियन ओशन डायपोल (आयओडी)सद्यस्थितीत तटस्थ.
– हवामान बदलाचा मान्सूनवर वाढता परिणाम

Web Title: Meteorologist onion to farmers imd alert to 98 percent rain in maharashtra latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
2

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
3

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले
4

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.