Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’; निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर एकत्र आले, ही या निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी होती. मात्र, ही युती केवळ कागदावरच ‘गेम-चेंजर’ ठरली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 17, 2026 | 10:30 AM
Municipal Elections, Municipal Election Result 2026,

Municipal Elections, Municipal Election Result 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  •  मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गटाचे बहुमत
  • राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
  • विजयी उमेदवारांचे कौतुक  आणि प्रोत्साहन
Raj Thackeray on BMC Election 2026: मागील 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती. पण यावर्षीच्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने बहुमत गाठत मुंबई महापालिका काबीज केली. काल मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या.  पण त्याचवेळी ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले. तर मनसेचा केवळ ६ जागांवर विजय झाला. या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमध्ये?

सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र

राज ठाकरे

ठाकरे बंधूंची ‘एकता’ मतदारांनी नाकारली

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर एकत्र आले, ही या निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी होती. मात्र, ही युती केवळ कागदावरच ‘गेम-चेंजर’ ठरली. ठाकरे बंधूंची ही एकता मतदारांना हे पटवून देण्यात अपयशी ठरली की, ते मुंबईचा विकास भाजपपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांचे पारंपारिक भावनिक आवाहन यावेळी मतपेटीत रूपांतरित होऊ शकले नाही. (Municipal Election Result 2026)

Municipal Election Result 2026: मुंबईत कमळ फुललं! बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर; मुख्यमंत्र्यांनी म्हणाले….

 मराठी मतांचे प्रचंड विभाजन

मराठी मतांचे एकत्रीकरण होईल, अशी अपेक्षा ठाकरे गटाला होती. मात्र, प्रत्यक्षात ही मते शिवसेना (UBT), मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात विभागली गेली. या विभाजनाचा थेट फायदा भाजपला झाला. महायुतीने केवळ हिंदी भाषिकच नव्हे, तर मराठी मतदारांचाही एक मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.

Web Title: Raj thackerays facebook post after the election results is being discussed news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • raj thackeray

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले
2

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.