Muralidhar Mohol met Raj Thackeray
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने राज्यभर दौरे करत आहेत. यंदा मनसने मोठ्या संख्येने आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. राज्यभरात दौरे करत असतानाच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, निवडणूक निकालानंतर त्यांची पक्ष म्हणून राजकीय भूमिका काय भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि मनसेच्या पाठिंब्यांवर महायुतीचे सरकार स्थापन होईल. त्यावरून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली होती. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर त्यांनी जाहीरपणे महायुतीला पाठिंबा दिल्याचे बोललं जाऊ लागले. पण आता त्यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Resrve Bank Of India Threatened Call:’ मी लष्कर-ए-तैयबाचा सीईओ….’; रिझर्व्ह बँकेला धमकीचा कॉल अन्
विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असेल, असा प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हणाले, या निवडणुकीत काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. मला वाटतं यावेळी अनेक गोष्टी घडतील. वेगवेगळे सरप्राईजेस मिळतील, अजून 8-10 दिवस थांबा. मग तुम्हाला कळेल, काय सरप्राईजेस आहेत. हे आधीच कसं सांगणार, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांणा उधाण आले आहे.
त्यानंतर राज ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आणि भाजपचं सरकार येण्याच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला.यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी बोलता बोलता म्हणालो होतो की महायुतीचं सरकार येईल. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती. पण ही माझी इच्छा नाही तर भाकित आहे. ती युती आहे. त्यात कोण मुख्यमंत्री होणार हे त्यांच्या पक्षातील वरिष्ठ ठरवतील. पण आमच्या पाठिंब्याशिवाय त्यांचं सरकार स्थापन होणार नाही, हे मात्र निश्चित आहे. तुम्ही बघालच, असंही राज ठाकरे यांनी नमुद केलं.
अमेरिकेकडून 1400 हून अधिक पुरातन वस्तू परत; भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन
भाजपालाच का पाठिंबा देणार, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “शिवसेनेत असल्यापासून माझा भाजपाशीच दुसरा राजकीय पक्ष म्हणून संबंध आला. पण काँग्रेस-राष्ट्रवादीशी माझा तसा कधीही संबंध आला नाही. तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधू शकता आणि त्यांच्यासोबत तुम्ही राहू शकता”,
राज ठाकरेंनी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांची विषयांची समज, त्यांची सोडवणूक करणं, महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत त्यांच आकलन’ हे सर्व चांगलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार माणूस आहेत. ते कोणालाही सढळ हातांनी मदत करतात. राजकारणात अशा माणसांची गरज आहे. त्यामुळे त्यांच कॉम्बिने न योग्य पद्धतीने सुरू आहे. असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
Bigg Boss 18 : सलमान खानने लावली आग, करणवीरचे काळे सत्य शिल्पासमोर केलं उघड