वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवरा शशांक, सासू लता, आणि नणंद करीश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रावदादी कॉंग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. सासरच्यांनी हुंड्यासाठी अतोनात छळ केल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनी अटक करण्यात आली.
Big Breaking: ‘चार कानाखाली मारल्या म्हणजे अमानुष छळ…’; हगवणेंच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद
शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी सून होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा अतोनात मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नात एक फॉर्च्युनर कार, ५१ तोळे सोने आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. तरीही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. नंतर तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं. यातून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
वैष्णवी आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरच्यांचा विरोध होता. तरीही वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. तिच्या घरातल्यांनीही राग मनात न ठेवता थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वारंवार वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतला होता. त्यानंतर पोलीस तक्रारही केली होती, असं वैष्णवीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं होतं.
Vaishanavi Hagawane News: हगवणे बंधुंचा पाय खोलात…; पिस्तुल परवान्याची होणार चौकशी
दरम्यान ‘वैष्णवी दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते चॅट आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वैष्णवीची प्रवृत्तीच मूळात आत्महत्येची होती. त्या व्यक्तीने नाही म्हटलं असेल म्हणून तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्येमागे मूळ कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे’, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.