हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपीना कोर्टाने एक दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. दरम्यान आज आरोपीना कोर्टात हजर केले असता जोरदार युक्तिवाद झाल्याचे पाहायला मिळाले. हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नको त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे,. नवऱ्याने बायकोच्या चार कानाखाली मारल्या म्हणजे अमानुष छळ होत नाही. त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, असे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले आहे.
फिर्यादीच्या वकिलांची मागणी काय?
वैष्णवी मृत्यू प्रकरणात आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले. यावले फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टसमोर त्यान पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. फरार असलेला नीलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे. वैष्णवीला मारहाण करण्यात आलेली हत्यारे जप्त करायची आहेत. त्यासाठी पोलिस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी वकिलांनी केली.
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवरा शशांक, सासू लता, आणि नणंद करीश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरच्यांचा विरोध होता. तरीही वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. तिच्या घरातल्यांनीही राग मनात न ठेवता थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वारंवार वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतला होता. त्यानंतर पोलीस तक्रारही केली होती, असं वैष्णवीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं होतं.