Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 11:36 AM
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा

राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून, त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

या भेटीनंतर सपकाळ म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योगपतींना मात्र मोकळे रान करून दिले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज नसताना व कोणीही त्याची मागणी केली नसताना केवळ लाडक्या उद्योगपतींना गडचिरोलीतील खजिन संपत्ती लुटून थेट गोव्याच्या समुद्री किनारी सुरळीत वाहतुक करता यावी यासाठी मध्य भारतातून गोव्यापर्यंत हा महामार्ग आखला आहे, या शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे असेही सपकाळ म्हणाले.

कोकणच्या शेतकऱ्यांसाठी ‘वर्षा’वर धडक मोर्चा

माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, कोकणातील आंबा व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून खर्च मात्र जास्त होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. आंब्याच्या एका कलमाला वर्षाला ३८०० ते ४००० रुपये खर्च येतो, मजुराला दिवसाला ८०० रुपये द्यावे लागतात आणि सरकारने मात्र एका कलमाला फक्त २०० रुपये नुकसान भरपाई दिली आहे, ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. एनडीआरएफमधून तसेच राज्य सरकारने भरीव मदत दिली पाहिजे, विमा कंपन्यांनीही नुकसान भरपाई दिली नाही.

कोकणातील शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरु असून १८ तारखेला रत्नागिरीत पुढील आंदोलनासंदर्भात मेळावा होणार आहे. सरकारने भरीव मदत दिली नाहीतर मुंबईत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल. गिरगावपासून वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. कोकणातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे तसा इतर पक्षांनीही द्यावा, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Web Title: Raju shetti president of swabhimani shetkari sanghatana has met congress leader harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा
1

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
2

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप
3

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

महायुतीकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप, जनता महायुतीला माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा
4

महायुतीकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप, जनता महायुतीला माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.