Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी व पूर्णेकर हत्याकांडाचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 04:44 PM
पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी

पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर हर्षवर्धन सपकाळांचे प्रश्नचिन्ह
  • ठाण्याबाहेरील IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र SIT ची मागणी
  • हत्येमागील शक्ती उघड करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे ते चौकशीतून समोर आले पाहिजे. परंतु पोलिसांचा आतापर्यंतचा तपास पाहता कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे स्पष्ट दिसत आहे. सध्याची एसआयटी ही केवळ धूळफेक असून ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी व हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ठाण्यात पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पूर्णेकर यांच्या हत्येचा तपासात काहीही प्रगती दिसत नाही. पूर्णेकर कुटुंबानी जे पुरावे दिले, ज्यांचा या हत्येमागे संशय आहे त्यांची नावे दिली पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एफआयआर दाखल करून घेण्यापासूनच हा तपास भरकटलेला आहे. आताची चौकशी ही वरवरची असून मुख्य आरोपींना अभय दिले जात आहे. जी एसआयटी स्थापन केली आहे ती स्थानिक पोलिसांची आहे. पूर्णेकर कुटुंब व ठाणेकरांचा या एसआयटीवर विश्वास नाही. ही हत्या अत्यंत गंभीर असून हत्येपूर्वी प्रदीप पूर्णेकर यांनीही त्यांच्या जीवाला धोका आहे हे सांगितले होते, त्याकडे तपासाची चक्रे फिरत नाहीत. सरकारने पूर्णेकर कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. या कठीण प्रसंगात काँग्रेस पक्ष पुर्णेकर कुटुंबियांसोबत आहे असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष संगीता कोटल, सेवादलाचे अध्यरविंद्र कोळी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

एकूण पाच जणांना अटक

पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात मुख्य आरोप पप्या शिंदे याच्यासह आणखी चार जणांचा समावेश आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच कट रचून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केल्या आरोप केला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना सातवेळा चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी काय मागणी केली?

    Ans: हत्याकांडाचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा आणि ठाण्याबाहेरील IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

  • Que: सध्याच्या SIT बाबत सपकाळ यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: सध्याची SIT म्हणजे केवळ धूळफेक असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या तपासावर पूर्णेकर कुटुंबीयांचा विश्वास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  • Que: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाबाबत सपकाळ यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला?

    Ans: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे, हे चौकशीतून समोर आले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. तसेच, संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून त्यांनी कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली.

Web Title: Harshvardhan sapkal has made a major demand to the government regarding the purnekar murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • Murder Case
  • Pradeep Purnekar

संबंधित बातम्या

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
1

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे
2

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
3

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
4

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.