
Maharashtra Politics: "शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास..."; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास गाठ आमच्याशी- राजू शेट्टी
सरकारने घेतला जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय
कर्जमाफी करण्यासाठी उच्च स्त्रीय समिती स्थापन
सांगली: नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर शासनाने एक उच्च अधिकार समिती गठित करून जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यामध्ये कोणतीही मर्यादा न घालता, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशारा माझी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजू शेट्टी म्हणाले, ” चालू वर्षे ३० हजार कोटी थकबाकी आहे, मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेल्या चर्चेत थकीत असणारे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली, यासाठी उच्चस्थरिय समिती स्थापन केलीं आहे, जो निवळ शेतकरी आहे, त्याचे कर्ज सरसकट माफ करा, अशीच आमची मागणी आहे, मात्र यापूर्वी प्रमाणे कर्ज मर्यादा घालू नयेत, राज्यात दर दोन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेत मालाला भाव नाही, मोठ्या प्रमाणात शेती पडीक होत आहे, याला सरकार जबाबदार आहे. ”
फळ बागांसाठी वेगळा निकष असावा
माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी मदत मिळाली , मात्र ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी नाही, एकरी अडीच ते तीन लाख केवळ उत्पादन खर्च आहे, केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २४०० कोटी शेतकऱ्यांचे कर्ज आहे, ते माफ करायला जून २०२६ उजडणार आहे, तो पर्यंत शेतकऱ्यांना जाच नको, शिवाय सीबील खराब नको, आशा मागण्या आम्ही करणार आहोत.सरसकट कर्ज माफी, देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळावा, निवडणूकीत भाजपने आश्वासन दिले आहे. असेही ते म्हणाले.
Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?
सांगली जिल्ह्यात शेतकरी मेळावा
सांगली,सह सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात द्राक्षे बागांचे नुकसान आणि इतर पिकांचे नुकसान, अभ्यासक, शेतकरी चळवळीतील संघटना, याची चर्चा सत्र घेतो आहोत. या चर्चा सत्राला अजित नवले, बच्चू कडू, वामनराव चटक असे शेतकरी नेते, शेतकरी अभ्यासक , अर्थतज्ञ उपस्थित राहणार असून शेतकरी प्रश्नांचे चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे राजू शेट्टी व संजय काका यांनी सांगितले.