हिंगोलीत पैसे उडवतानाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्य सरकारने जाहीर केले 31 हजार कोटींचे पॅकेज
हिंगोलीत पैसे उडवल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातचे पीक उध्वस्त झाले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान राज्यातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये काही शेतकरी 50 आणि 100 च्या नोटा उडवत आहेत. नेमका हा व्हिडिओ काय आहे, ते पाहुयात.
महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर 50 आणि 100 रुपयांच्या नोटा उडवत आहेत. प्रचंड पावसाने झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचे म्हटले जात आहे. या व्हीडिओत नेमके काय दिसून येत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
क्रांतिकारी किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर प्रदर्शन केले. ‘जर सरकारने आम्हाला त्यांच्या पॅकेजमधून वगळले तर त्यांचे पैसे आम्हाला नकोत. ते पैसे आम्ही त्यांच्या तोंडवर फेकत आहोत’, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र के हिंगोली जिले में बाढ़ और बारिश से तबाह हुई फसलों के बाद किसान सरकार से न्याय की मांग कर रहे हैं। एक वीडियो में किसान सड़कों पर 100, 50 और 20 रुपये के नोट उड़ाते दिख रहे हैं।#maharashtranews #HingoliFarmersProtest #MaharashtraFarmers #RainDamageCompensation pic.twitter.com/LGu0Xi73ly — NavBharat Live (@TheNavbharatliv) October 10, 2025
मदतीच्या पॅकेजमध्ये हिंगोलीचा समावेश नाही?
राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकतेच राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र यामध्ये हिंगोली आणि जिल्ह्यातील काही तालुक्याचा समावेश नसल्याचे म्हटले जात आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. तरीदेखील त्यांना मदतीच्या पॅकेजमध्ये समाविष्ट केले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार
शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
जनावरांना ३७ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी केली अजणार आहे. ज्या शेतकऱ्यांची घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत उभी केली जाणार आहेत.