Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Jamkhed News: राम शिंदेचा अजित पवारांवर गंभीर आरोप; कर्जत-जामखेडमध्ये नेमकं काय घडलं?

माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेदेखील याठिकाणी उपस्थित होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 25, 2024 | 01:43 PM
अजित - रोहित भेटीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया

अजित - रोहित भेटीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्या विरूद्ध  भाजपचे  उमेदवार राम शिंदे अशी लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत रोहित पवार विजयी झाले. पण या निर्णयावर आता राम शिंदे यांनी संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. यावेळी रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले असता रोहित पवारांनी अजित पवारांना पाहताच  त्यांना नमस्कार केला. त्यावर अजित पवार म्हणाले,  दर्शन घे दर्शन. काकाचं.  दादांच्या बोलण्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला. अजित पवार म्हणाले,  ‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास… माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं. बेस्ट ऑफ लक. ”  असा संवाद झाल्यानंतर दोघेही निघून गेले.

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. 2019 च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता. पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं अभिनंदन केलं, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

 

Nana Patole : नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार ? विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय

या संवादानंतर राम शिंदे यांनी, आपल्याविरोधात कट झाल्याचा आरोप केला  आहे. अजित पवार रोहित पवारांना म्हणाले मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं. हा नियोजित कट होता. अजित पवार हेदेखील या त त्यात माझा बळी गेला. रोहित पवार या राज्याचे भावी मंत्री समजतात, त्यांनी  या निवडणुकीत स्वत:चा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठात जे झालं त्याचा मी बळी ठरलो आहे. असं म्हणत त्यांनी अजित पवार हेदेखील या कटात सहभागी होते असा अप्रत्यक्ष आरोप केला.

कर्जत-जामखेडमध्ये काय झालं?

निकालाच्या दिवशी  मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर  पोस्टल मतांपासून रोहित पवारांनी आघाडी घेतली होती. हळूहळू दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली, कधी रोहीत पवार आघाडीवर तर कधी राम शिंदे सायंकाळपर्यंत दोघांमध्येही आघाडी पिछाडी सुरू होती. सायंकाळी पाच-साडेपाचनंतर चित्र स्पष्ट होऊ लागलं. कर्जत-जामखेडमध्ये 2,60,380 एवढं मतदान झालं होतं. तर एकूण मतदानाची टक्केवारी 74.94 इतकी होती. अखेर या चुरशीच्या लढतीत रोहीत पवारांनी बाजी मारत विजय मिळवला.

 

 

Web Title: Ram shindes indirect accusations against ajit pawar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra election 2024
  • ram shinde
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
3

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.