Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काहीतरी वक्तव्य करून महिलेचा अपमान करणे योग्य नाही…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन राजकारण रंगलेले असताना यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2025 | 05:45 PM
Ramdas athavle reaction on neelam gorhe statement in indapur

Ramdas athavle reaction on neelam gorhe statement in indapur

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकारण रंगले होते. दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण रंगले आहे. ‘त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत, हे माहीत नाही,परंतू काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही अशा शब्दांत नीलम गोऱ्हे विरुध्द संजय राऊत प्रकरणासंदर्भात दोघांना ही फटकारणारी प्रतिक्रिया केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सोलापूरहून मुंबईकडे जाताना सोमवारी (दि.२४) सायंकाळी रामदास आठवले हे काही काळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी रिपाइंचे पुणे जिल्हा प्रभारी विक्रम शेलार,जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,तालुका युवकचे अध्यक्ष संदेश सोनवणे,शहराध्यक्ष अमोल मिसाळ, नितीन झेंडे, भाजपचे किरण गानबोटे,राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे,हनुमंत कांबळे,संदिपान कडवळे,अरविंद वाघ यांनी आठवले यांचे स्वागत केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, “विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे समाजवादी कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या.त्यांनी काही वर्षे रिपाइंचे काम केले आहे.शिवसेनेत ही काम केले. त्याना तेथे चार वेळा आमदार केले.आत्ता त्या शिंदेसेनेत आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे कायमस्वरुपी एकत्र येतील असे आपल्याला वाटत नाही.ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे.राज ठाकरे यांच्या एवढ्या मोठ्या सभा होऊन ही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. दोघे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही,” असे रामदास आठवले म्हणाले.

“अनेकदा एकमेकांची जात पात माहित नसताना मुलं मुली एकत्र येतात.एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते.कित्येक प्रकरणात धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये.हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल व मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असे आपले मत आहे.ज्या वेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात तशी तरतूद असावी,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे? 

शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं,” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Ramdas athavle reaction on neelam gorhe statement in indapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Mahayuti Government
  • Neelam Gorhe
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
1

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन
2

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

Maharashtra News: “मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला…”; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान
3

Maharashtra News: “मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारीला…”; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?
4

Ladki Bahin Yojana july installment : लाडक्या बहिणींना कधी मिळणार जुलैचा हप्ता; रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तरी होणार का धनलाभ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.