मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महायुतीमधील नेत्यांनी टीका केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. घटना होऊन 50 तास उलटून गेले असून अद्याप आरोपी हाती न आल्यामुळे टीका केली जात आहे. आरोपी हा गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा पुणे पोलीस शोध घेत असून 11 पथकं हा शोध घेत आहेत. या आरोपीला शोधून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील अत्याचार प्रकरणावरुन राजकारण देखील तापले आहे. अनेकांनी आरोपीला अटक करुन फाशी देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस देखील आरोपीचा तपास करत आहेत. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील स्वारगेट बसस्थानकाची पाहणी करुन आढावा घेतला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा करुन पत्रकार परिषद घेतली आहे. यानंतर आता आरोपी दत्तात्रय गाडे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचे शेवटचे लोकेशन समोर आले आहे. शिरुरमध्ये तो शेवटचा गेला असल्याचे समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले छगन भुजबळ?
अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी पुण्यातील अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, “मी वर्तमानपत्रातून पुणे बलात्काराची घटना वाचली. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते आरोपीला शोधून काढतील आणि अटक करतील. सरकारही या सगळ्या गोष्टींमध्ये काळजीपूर्वक आदेश देतं आहे. मात्र पुणे बलात्काराची घटना लांछनास्पद आहे. कसं झालं? काय झालं ? याची चौकशी सुरु आहे. इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. याआधीही असं काही घडलं आहे का? जर होत असेल तर लोक गप्प कसे बसले? पोलीस गप्प बसले? याची चौकशी झाली पाहिजे ही सगळ्यांचीच मागणी आहे.” असे मत आमदार छगन भुजबळ यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसत आहेत. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे..