
Ramkumar Gupta Missing Uttarkashi
बेपत्ता पर्यटकाची (Maharashtra Tourist) ओळख रामकुमार हनुमान गुप्ता अशी पटली असून, ते महाराष्ट्रातील राजगड येथील रहिवासी आहेत. ते गंगोत्रीहून गोमुखच्या दिशेने जाणाऱ्या पाच जणांच्या गटाचा भाग होते.शनिवारी, १८ जणांचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.पथकात एसडीआरएफचे सहा,नेपाळचे चार, वनविभागाचे चार आणि पोलीस दलातील दोन जणांचा समावेश होता.ही पथके घटनास्थळी पोहोचली असून बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत.
मात्र,खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हवामानात सुधारणा होताच शोध मोहीम अधिक तीव्र केली जाईल.आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, सध्या बेपत्ता पर्यटकाचा कोणताही मागमूस लागलेला नाही. संबंधित विभागांच्या समन्वयाने बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. तपास पथके घटनास्थळी पोहोचली असून बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत.मात्र, खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.हवामानात सुधारणा होताच शोध मोहीम अधिक तीव्र केली जाईल.आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, सध्या बेपत्ता पर्यटकाचा कोणताही मागमूस लागलेला नाही.संबंधित विभागांच्या समन्वयाने बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.