Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

Ola-Uber, Rapido: रॅपिडो, ओला आणि उबर या अ‍ॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमधील चालकांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2026 | 06:55 PM
Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • रॅपिडो, ओला, उबर चालकांची काटेकोर तपासणी करा
  • दोषींवर गुन्हे दाखल करा
  • प्रताप सरनाईकांचे निर्देश
मुंबई : रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांची काटेकोर तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटार परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. (Ola-Uber, Rapido)

मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया खात्यांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानमधील व्यक्ती किंवा संघटनेशी थेट संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचे वृत्त आहे.

या घटनेच्या अनुषंगाने ॲपआधारित वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांची पडताळणी, त्यांच्या कागदपत्रांची वैधता आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले.

चालकांची पडताळणी आणि नियमभंगावर कठोर कारवाई

रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची पार्श्वभूमी, परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित नियमांचे पालन यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा कायद्याने दखलपात्र ठरणारे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.

केवळ एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा प्रकारच्या वाहतूक सेवांवर नियमित देखरेख ठेवून त्यांना राज्य परिवहन प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी. तसेच संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गरज पडल्यास कायद्यात सुधारणा

ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांचा विस्तार होत असताना या क्षेत्रातील चालकांना लागू असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये आवश्यक तरतुदी अपुऱ्या ठरत असतील, तर चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सुधारित कायदा तयार करण्याच्या पर्यायाचाही गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.
प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेतील शिस्त आणि कायद्याचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून तक्रारींची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी बजावले.

ॲपआधारित वाहतूक सेवांमुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत असल्या, तरी या सेवांमधील चालकांची पडताळणी आणि नियमन अधिक प्रभावी करण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?

Web Title: Rapido ola uber driver verification strict action pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!
1

Bhandara News: व्यसन सोडणे बनतेय आव्हान; मुखकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक! खर्रा-सिगारेटच्या विळख्यात ग्रामीण तरुणाई!

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर
2

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

Pratap Sarnaik on Manoj Jarange : ‘जरांगेंनी स्वतःचा पक्ष काढावा!’ प्रताप सरनाईकांचा खोचक टोला, ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
3

Pratap Sarnaik on Manoj Jarange : ‘जरांगेंनी स्वतःचा पक्ष काढावा!’ प्रताप सरनाईकांचा खोचक टोला, ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र
4

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.