Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Financial Crisis: शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

Financial Crisis: आपल्या शब्दांनी वाचकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका कवीवर आज आर्थिक संकटाचे सावट आहे. शालेय अभ्यासक्रमापासून एम.ए.पर्यंत त्यांच्या कवितांचा गौरव झाला असतानाही पत्नीच्या उपचारांसाठी त्यांना मोठे कर्ज घ्यावे लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2026 | 06:06 PM
शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत; पत्नीच्या उपचारांसाठी कर्जाचा डोंगर

Follow Us
Follow Us:
  • शब्दांचे सोने करणारा कवी आर्थिक विवंचनेत
  • शालेय अभ्यासक्रमापासून एम.ए.पर्यंत कवितांचा गौरव;
  • पत्नीच्या उपचारासाठी कर्जाचा डोंगर
  • स्थानिकांकडून मात्र उपेक्षा
अमोल तोरणे, बारामती: शेतकऱ्यांच्या वेदना, ग्रामीण जीवनातील वास्तव आणि मातीशी नातं सांगणाऱ्या शब्दांना कवितेच्या माध्यमातून सशक्त अभिव्यक्ती देणारे बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे आज आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. त्यांच्या साहित्याची दखल राज्यस्तरावर घेतली जात असताना, वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांच्यावर कठीण परिस्थितीचा डोंगर कोसळला आहे. पत्नीच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचे ओझे डोक्यावर असताना या प्रतिभावान कवीला आता समाजाच्या मदतीची गरज आहे. (Financial Crisis)

हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण महाराष्ट्राचे जगणे, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण केले आहे. ‘भेगा भुईच्या सांदताना’ या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘झाड व्हायचं दोघांनी’ या दीर्घकाव्याचा मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे. ‘आडतास’ या लोकलयीतील काव्यसंग्रहानेही साहित्यविश्वाचे लक्ष वेधले आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; मावळच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शासकीय समिती येणार

विशेष म्हणजे, त्यांच्या ‘आळाशी’ या कवितेचा इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात ‘लेक’ या गीताला, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘किणकीण घुंगराची’ या कवितेला स्थान मिळाले आहे. याशिवाय, ‘आडतास’ या संपूर्ण काव्यसंग्रहाचा २०२६ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहाला अभ्यासक्रमात ५० गुणांचे स्थान असल्याचे सांगण्यात येते.

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातही चांदगुडे यांच्या लेखणीचा ठसा उमटला आहे. चर्चेत असलेल्या ‘टीडीएम’ चित्रपटासह ‘संत सेना’, ‘गुलामी’, ‘विपरीत’, ‘तांडा’, ‘पाऊस’ आणि ‘हंबरडा’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ उपक्रमासाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत. विविध वेबसिरीजची शीर्षकगीते, मालिकांचे शीर्षकगीत आणि लोकगीते त्यांच्या नावावर आहेत.

यशवंतराव सावंत जीवनगौरव पुरस्कार, गदिमा पुरस्कार, संत तुकाराम साहित्यरत्न पुरस्कार आणि राष्ट्रशाहीर अमर शेख राज्य पुरस्कार यांसह त्यांना एकूण ३३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘कवी मुलांच्या भेटीला’ या उपक्रमातून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या कवीच्या आयुष्यात मात्र आर्थिक अडचणींचे सावट आहे. त्यांच्या प्रतिभेचा गौरव केवळ पुरस्कार आणि अभ्यासक्रमांपुरता मर्यादित न राहता, त्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून पुढे येऊन मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या हनुमंत चांदगुडे यांना समाजातील दानशूर व्यक्ती, साहित्यप्रेमी आणि संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा साहित्य साहित्य प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

Bhor Rice Crop Damage: भोर तालुक्यात पावसाची प्रदीर्घ ओढ; ‘इंद्रायणी’ भात पिके करपली, ६५ ते ७० टक्के शेती बाधित

Web Title: Marathi poet financial crisis debt for wifes medical treatment sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • baramati
  • Farmers
  • financial crisis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश
1

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; मावळच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शासकीय समिती येणार
2

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; मावळच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शासकीय समिती येणार

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र
3

Nagpur Luxury Township: नागपुरात लक्झरी रिअल इस्टेटला नवी झळाळी! क्रिसाला डेव्हलपर्स आणि एलेव्हा बाय हिरानंदानी एकत्र

Cabinet Meeting Decision:  १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.