
मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मागील काही महिन्यांपासून पूर्णतः ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदारांनी बंद केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि अनेक खळबळ माजवणाऱ्या घटना घडल्या. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि दोन गट स्थापन झाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी यांच्यावरतीही आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांवर शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तारांवर पुन्हा तोफ डागली आहे.
अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, किमान त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी समोर ठेवला होता. मुख्यमंत्री पदी असताना अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले दिसले होते. मी मंत्री असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार अशा शब्दात सत्तार यांनी टीका केली.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिंदे गटातील आमदार खासदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. या गुवाहाटी दौऱ्यामध्ये राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि काही आमदार मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत जाणार नाहीत. त्यामुळे गुवाहाटीला न जाणाऱ्या आमदारांविषयी खूप चर्चा रंगात आहे. यासंदर्भात सत्तार यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि माझ्या संबंधांमध्ये कुठलाही दुरावा नाही. मी कुणावरही नाराज नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत असे अब्दुल सत्तारांनी सांगितले.