Lok Sabha Election 2024 : यंदाचे लोकसभेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये पुण्यात पंतप्रधान मोदी यांनी सभेत पवारांवर जहरी टीका केल्यानंतर त्यावरून राज्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीत यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगलेला असतानाच आता या ओबीसी नेत्याच्या ‘या’ खास वक्तव्याने फोडणी बसली आहे.
महाराष्ट्रात निवडणूक मोदी विरुद्ध पवार
महाराष्ट्रातील निवडणूक मोदी विरुद्ध पवार अशीच झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात खासदारकीसाठी थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
जानकरांनी असा साधला निशाणा
सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय असा टोला जानकरांनी हाणला. त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा आहे. जानकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान महायुतीत यशस्वी मध्यस्थी झाल्याने परभणीची जागा रासपसाठी सोडण्यात आली. जानकर आता परभणीतून लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आले आहेत.
धनगर आरक्षणावर भूमिका
मी मंत्री होतो तेंव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेस सरकारने अश्या योजना कधी लागू केल्या, अस सवाल त्यांनी विचारला. उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे, आदिसांच्या 22 योजना धनगर समाजाला द्याव्या ही मी मागणी मोदींना करणार असे ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर म्हणता आणि धनगर समाजाला व्हॉईस चेअरमन करता. ओबीसींना घटनात्मक दर्जा देण्याच काम मोदी सरकारने केलं. धनगर समाजासाठी आम्ही सक्षम आहोत, आम्ही त्या क्याडरचे लिडर आहोत, असे ते म्हणाले.
ओबीसी समाज अजितदादांच्या पाठिशी
संविधान हे कोणी बदलू शकत नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.. तसेच उत्तम जानकर हे आमदारकीच्या उमेदवारीसाठी जात बदलत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर मी बोलणे पसंत करत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्यावर प्रेम करणारा ओबीसी समाज अजितदादांच्या पाठिशी असल्याचा दावा त्यांनी केला.
Web Title: Rashtriya samaj party chief mahadev jankar gave a shout out to supriya sule a sister does not want to stay long at her brothers house nryb