अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? सुनेत्रा पवारांनी दिले उत्तर
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही अनेकवेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशा प्रार्थनाही केलेल्या आहेत. या सगळ्यात अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर भाष्य केलं आहे.
माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि तुम्हीही लवकरच पांडुरंगाची पूजा करावी, अशी तुमची इच्छा आहे का, असा सवाल विचारण्यात आला. यावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “मी नेहमी चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असते. पण शेवटी काय द्यायचं काय द्यायचं नाही हे देवाच्या हातात असतं. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनातील इच्छा ऐकतील.
दरम्यान, गेल्या महिन्यातच, एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. आपण आतापर्यंत अनेकदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालो आहोत. पण अद्याप आपल्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळालेली नाही. मुंबईतील कार्यक्रमातहीत त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. “राही भिडे म्हणाल्या होत्या की, भविष्यात या महाराष्ट्राला एखादी तरी महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे. आपल्याल सगळ्यांनाही तसं वाटतं असतं. पण योग जूळुन यावा लागतो. कारण मलाही गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावसं वाटत. पण जमतयं कुठे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली होती. अजित पवार महाविकास आघाडत आले तर, त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. असं राऊत म्हणाले होते.
Kolhapur News : शिरोलीत ‘शोले स्टाईल’ तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्…