कंगना राणौतच्या घरी आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये एनसीपी खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाल्या आहेत (फोटो - एक्स)
Sunetra Pawar in RSS program : मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष पुरोगामी विचारधारांवर चालणारा पक्ष मानला जातो. मात्र अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार RSS च्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या दिसून आल्या आहेत. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. यावरुन आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो कंगना राणौतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महिला शाखेच्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी नेत्या व खासदार सुनेत्रा पवार या देखील उपस्थि होत्या. कंगना राणौत हिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज माझ्या निवासस्थानी ‘राष्ट्र सेविका समिती’ महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू. आपण सर्वांनी मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केला आहे. महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो, असे लिहित कंगना राणौतने या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।
हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।
महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुनेत्रा पवार या राष्ट्र सेविका समिती’च्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी हा दुटप्पीपणा असल्याचे म्हणत टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, जेव्हा ओबीसी आरक्षण देण्यात आलं त्यावेळी कमंडल यात्रा काय होती हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे होतं. सत्तेमध्ये ते गेले आहेत. त्याची कारणं ही वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या. एखादा फोटो येऊ द्या…म्हणजे ते आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता. चव्हाण साहेबांचे, शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्हा किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे. आणि आज राजकारणामध्ये लोकांना दुटप्पी भूमिका नको आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्र सेवा समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. याबाबत अजित पवार म्हणाले की, मी विचारतो. मला याबद्दल माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते याची मिनिट मिनिटची माहिती माझ्याकडे नसते. मी आता विचारतो. काय गं कुठे गेली होती? असे खोचक प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.