• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Ratnagiri News Accident Season Should Be Reduced Speed Breakers Must Be Seen On Guhagar Bypass Demand Of Locals

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 13, 2025 | 12:52 PM
Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •  अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं
  • गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच, स्थानिकांची मागणी
  • प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी

चिपळूण : राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य महामार्ग खड्ड्यांची समस्या कायमच आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे दिवसेंदिवस प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. सध्या चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खंड बायपास, चिपळूण) यांनी केली आहे.

या संदर्भात मंडळाच्या वतीने चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदर मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला  आहे.”

मंडळाने यापूर्वीही उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना समस्येविषयी माहिती देऊन वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक कारणास्तव जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, “सदर परवानगी घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे.

बावशेवाडी येथे रस्त्याला दोन ठिकाणी टी-जॉइंट येतात तसेच वळण असल्याने वाहनांचा वेग वाढल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत आमदार शेखर निकम यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. सध्या लांबच्या पल्ल्या प्रवास जीवघेणा ठरत आहे, याचं कारण म्हणजे रस्त्यांवर असलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था. आतारपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी गेल्याचं अहवालामध्ये सांगितलेलं आहे.  या सगळ्यावर काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी  रस्त्याची पाहणी केली होती. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले.

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष

 मात्र कोकणवासीयांचा सरकारच्या आश्वासनांवर विश्वास उरलेला नाही. प्रत्येक गणेशोत्सवाच्या तोंडावर दौरे, फोटोसेशन आणि गोड बोलांची परंपरा सुरू असते, पण वर्षभर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचा धोका पत्करावा लागतो. अपूर्ण टप्पे तातडीने पूर्ण करण्याचा ठोस आराखडा कुठे आहे? कामातील विलंबाबद्दल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली का? प्रत्येक टप्प्याचे पारदर्शक वेळापत्रक कधी जाहीर होणार? मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली जात नाही?

जनतेच्या ठाम मागण्याः प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याचे पालन करावे. जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा. मृत्यूग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी. गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. कोकणवासीयांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे आश्वासनं नकोत, आता कृती हवी. फोटो नकोत, खड्डेविरहित सुरक्षित प्रवास हवा, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. 

Thane News : SRA योजनेत रहिवाशांची फसवणूक; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

Web Title: Ratnagiri news accident season should be reduced speed breakers must be seen on guhagar bypass demand of locals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Accident Case
  • Chiplun
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक
1

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
2

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…
3

Accident Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक अन्…

Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
4

Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नाच्या ९ वर्षांनंतर दिव्यांका त्रिपाठी देणार गुड न्यूज? आई होण्याबद्दल व्यक्त केल्या भावना

लग्नाच्या ९ वर्षांनंतर दिव्यांका त्रिपाठी देणार गुड न्यूज? आई होण्याबद्दल व्यक्त केल्या भावना

Oct 30, 2025 | 09:53 AM
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…

लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…

Oct 30, 2025 | 09:40 AM
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश

पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश

Oct 30, 2025 | 09:38 AM
Bhandara Crime: फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव

Bhandara Crime: फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव

Oct 30, 2025 | 09:29 AM
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral

ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला धडकली Thar, तितक्यात समोरून आला दुसरा ट्रक अन् जे घडलं… Video Viral

Oct 30, 2025 | 09:00 AM
Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट

LIVE
Top Marathi News Today Live : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; पिकेही झाली नष्ट

Oct 30, 2025 | 09:00 AM
BO Collection: Deewaniyat आणि Thamma चित्रपटांना नवव्या दिवशी मोठा झटका; दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट

BO Collection: Deewaniyat आणि Thamma चित्रपटांना नवव्या दिवशी मोठा झटका; दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट

Oct 30, 2025 | 08:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.