Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ

उमरोली जिल्हा परिषद गटात भाजप-शिवसेना युतीचे योगेश शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार बाट) चे निलेश चव्हाण, शिवसेना उबाठाचे प्रमोद निवळकर आणि अपक्ष योगेश खांडेकर यांच्यात चौरंगी लढत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2026 | 02:18 PM
ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ
Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणकीचा धुरळा
गुढे, सावर्डे गण, गटांत रंगणार लढत
उमरोली गटात नियोजनबद्ध विकासाचे आश्वासन

चिपळूण: तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांची जोरदार धावपळ सुरू आहे. कळवंडे, सावर्डे, उमरोली, वहाळ, कोकरे आदी जिल्हा परिषद गटांसह विविध गणांमध्ये भाजप-शिवसेना युती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. युतीच्या उमेदवारांनी वैयक्तिक संपर्कावर भर देत प्रचारात आघाडी घेतली आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना भाजप आणि शिवसेना नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असून, युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समन्वय साधून विजयासाठी अथक परिश्रम घेत आहेत. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या गौतमी आदवडे, शिवसेना उबाठाच्या सामिया तांबे, भाजप-शिवसेना युतीच्या मयुरी शिर्के आणि वंचित बहुजन आघाडीच्या गीता जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे. मयुरी शिर्के यांनी कळवंडे गणाच्या सायली वाजे आणि भोम गणाच्या पूजा जवरत यांच्यासह मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात रंगत आणली आहे.

कळवंडे जिल्हा परिषद गटातही चौरंगी लढत

युतीच्या तिन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कळवंडे गणातून काँग्रेसतर्फे मुमताज दलवाई, शिवसेना उबाठाकडून निकिता निकम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नेहा वाजे, तर भोम गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वप्नाली माळी आणि शिवसेना उबाठाकडून पूजा शिगवण रिंगणात आहेत.

ZP Election 2026 : अलोरे जिल्हा परिषद गटात दुरंगी तर शिरगाव गटात तिरंगी लढत; युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना रंगणार

उमरोली गटात नियोजनबद्ध विकासाचे आश्वासन

उमरोली जिल्हा परिषद गटात भाजप-शिवसेना युतीचे योगेश शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार बाट) चे निलेश चव्हाण, शिवसेना उबाठाचे प्रमोद निवळकर आणि अपक्ष योगेश खांडेकर यांच्यात चौरंगी लढत आहे. माजी सरपंच व सरपंच संघटनेचे पदाधिकारी असलेले योगेश शिर्के यांनी नियोजनबद्ध विकासाचे आश्वासन देत प्रचारात आघाडी घेतली आहे.

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

गुढे, सावर्डे गण, गटांत रंगणार लढत

गुढे गणात भाजप-शिवसेना युतीच्या आराध्या रावणंग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सायली बंगाल आणि शिवसेना उबाठाच्या सुप्रिया वंजारे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सावर्डे जिल्हा परिषद गटात भाजप-शिवसेना युतीच्या माजी सभापती धनश्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा निकम आणि शिवसेना उबाठाच्या ममता खांबे आमने-सामने आहेत. माजी सभापतींमधील ही लढत ‘काँटे की टक्कर’ ठरण्याची शक्यता असून आमदार शेखर निकम यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची मानली जात आहे. युवराज राजेशिर्के, शौकत माखजणकर, सागर सावंत लढत होईल.

Web Title: Kalwande sawarde zp election candidate chiplun bjp shivsena news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Chiplun
  • Panchayat Samiti Elections
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद
1

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.