राजापूर / प्रतिनिधी – राजापूर शहरातील पुरातन असणाऱ्या चिंचबांध येथील सुर्यमंदिरात जर अनधिकृतरित्या अचानक उरुस करण्यास प्रवानगी दिली गेल्यास आम्ही त्याठिकाणी महाआरतीचे आयोजन करु असा इशारा राजापूर शहरातील समस्त सनातन हिंदु बांधवानी दिला आहे . या उरुसाला परवानगी देऊ नये व याठिकाणी उरुस साजरा करण्यात येऊ नये यासाठी आज सकाळी राजापूर पोलिसाना निवेदन देण्यात आले आहे .
सदर निवेदनामध्ये गांव मौजे राजापुर, येथील सध्याचे मच्छिमार्केट जवळ इ.स.वि.सन 700 मध्ये सातवाहन राजाने बांधलेले असावे असे पुरातन सुर्य मंदीर असुन, सदरचे सुर्य मंदीर हे हिंदु बांधवांचे श्रध्दा स्थान असल्याचे म्हटले आहे . सदर मंदीराचा उल्लेख हा सन 1717 मधील बखरीमध्ये देखिल आढळुन येतो. सदर मंदीराचे उल्लेख त्यांनतर सन 2015 मध्ये प्रसिध्द झालेल्या राजापुरचा इतिहास या पुस्तकात देखिल आहे. सदरचे पुस्तक हे इतिहासकार व स्वातंत्र्य सैनिक श्री. प्रभाकर द. मराठे यांनी लिहलेले आहे. सदरचे मंदीर हे प्राचिन असुन, सदर मंदीराचा ढाचा व अन्य शिल्पे पाहिल्यास सदरचे हिंदु मंदीर असल्याचे स्पष्ट होणारे आहे. तसेच, सदर मंदीराबाबत अन्य देखिल इतिहास असुन, योग्य त्या कागदपत्रांसहित सदरचे पुरावे सादर करणेस आमची तयारी आहे. सध्या उपलब्ध असणारे पुरावे या अर्जा सोबत जोडलेले असल्याचे म्हटले आहे .
सदर मंदीराकडे मुस्लीम समाजाचा कोणताही हक्कसंबंध नव्हता व नाही. परंतु, वृत्तपत्रामध्ये एक वृत्त प्रसिध्द झाले. तसेच, सदरचे पुरातन असे मंदीराचे जतन करणे करीता म्हणुन पुरातत्व खात्याकडे अर्ज करणे बाबतचा पाठपुरावा सध्या चालु असल्याचेही या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे .मुस्लीम समाजातील काही व्यक्ती समाजामध्ये आनंद पहावत नसलेने, काही खोडसाळ कृत्याचे व्दारे गैरप्रकार करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन सदर सुर्य मंदीर असलेल्या जमिन मिळकतीचे महसुल दफ्तरी देखिल खोडसाळ प्रकार केल्याचे दिसून येते. कसेही असलेतरी सदरेच सूर्य मंदीर हे पुरातन असे असुन, सदरचे मंदीर हे राष्ट्राची संपत्ती आहे व त्याबाबत खोडसाळ कागदपत्रे करुन त्याचे अस्तित्व नष्ट करता येणारे नाही. सबब, सदरचे मंदीर हे पुरातन
असे असुन, त्याचे जतन करणे आवश्यक आहे असेही या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे .
सदर मंदीरामध्ये त्याचे अस्तित्व नष्ट करणेचा प्रयत्न करून काही खोडसाळ ढाचे देखिल उभारणेचा प्रयत्न हा सदर मंदीरा बाबत वृत्तपत्रामध्ये नोटीस प्रसिध्द झालेवर करणेत आला असल्याचे समजते.सदर मंदीरामध्ये यापुर्वी कधीही कोणत्याही स्वरुपाचे उत्सव हे मुस्लीम समाजाकडून करणेत आलेले नव्हते व नाही. सदर मंदीराचे अस्तित्व घालऊन तेथे खोडसाळ ढाचे उभारुन सदर पुरातन मंदीर नष्ट करणेचे हेतुने काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. त्याच हेतुने आपल्या कार्यालयामध्ये उरुस साजरा करणेचे हेतुने परवानगी मागणे करीता म्हणुन एक अर्ज दिला असल्याचे समजते. वरनमुद केले प्रमाणे सदरचे मंदीर हे पुरातन असुन, हिंदु समाजाचे श्रध्दास्थान आहे. सबब, सदर ठिकाणी मंदीराचे पावित्र्य नष्ट करून अन्य कोणत्याही धर्मायांनी कोणत्याही स्वरुपाचे उत्सव केल्यास सामाजिक शांतता भंग पावणारी असुन, सध्या आपणाकडे मागणी करणेत आलेल्या उत्सवास आमचा सक्त विरोध असल्याचे राजापूर पोलिसाना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे .
मच्छिमार्केट जवळील चिंचबांधंचे सूर्य मंदीर येथे कोणत्याही व्यक्तीस उरुसाचे आयोजन करणेस परवानगी देणेत येऊ नये व तशी परवानगी दिल्यास आणि उरुस साजरा झाल्यास आम्ही त्या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करु असा इशाराही यावेळी उपस्थितानी दिला आहे . या निवेदनावर राजापूर शहरातील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत . त्यामुळे आता प्रशासन काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे .