Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

शेतकऱ्यांच्या कष्टांचा अभिमान आणि महिलांच्या हातातील पाककलेची जादू यांचा सुरेख संगम असलेला वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 5 ते 9 जानेवारी या कालावधीत होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 02, 2026 | 08:22 PM
Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
Follow Us
Close
Follow Us:
  • वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी !
  • 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
चिपळूण : कोकणच्या मातीचा सुगंध, शेतकऱ्यांच्या कष्टांचा अभिमान आणि महिलांच्या हातातील पाककलेची जादू यांचा सुरेख संगम असलेला वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 5 ते 9 जानेवारी या कालावधीत होत आहे. या महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा ही महिलांच्या कलागुणांना व पारंपरिक खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ देणारी ठरणार आहे. दि. 8 जानेवारी रोजी ‘गोड पाककला’ स्पर्धा तर 9 जानेवारी रोजी ‘तिखट पाककला’ स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धा सकाळी 10  ते दुपारी 2  या वेळेत स्वा. वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे महोत्सवाच्या ठिकाणीच पार पडतील, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी कृषी महोत्सवात शेतकरी, पशुपालक, बचतगट, महिला उद्योजिका तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे पाककला स्पर्धा होय. ही स्पर्धा दोन प्रकारांत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित असून, स्पर्धकांनी वाशिष्ठी डेअरीच्या दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेली पाककृती सादर करणे अनिवार्य आहे.

 Ratnagiri News: सरत्या वर्षाला पर्यटकांनी दिला निरोप; समुद्रकिनारी मोठा जल्लोष

एकच स्पर्धक गोड व तिखट पदार्थ वाशिष्ठी प्रॉडक्टपासून बनवू शकतात. दोन्ही प्रकारांत वेगवेगळे क्रमांक काढले जातील. पदार्थ बनविण्याकरिता लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वखर्चाने आणायचे आहेत. सजावटीसाठी व पदार्थ बनविण्यासाठी खाद्यपदार्थांचा वापर करावा. प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत. पदार्थ बनविण्यासाठीचा जास्तीत जास्त कालावधी एक तास असेल. जो पदार्थ बनवणार आहात, त्याची रेसिपी व कृती एका कागदावर सुवाच्च अक्षरात लिहून आणणे. तसेच आपला पदार्थ बनविण्यासाठी लागणारा वेळ आयोजकांना आधी कळवावा लागेल. चव, सजावट, नाविण्य आणि पौष्टीकतेला प्राधान्य देण्यात येईल. रेसिपी बनवताना व्हेज किंवा नॉनव्हेज असा उल्लेख करावा.  या पाककला स्पर्धेचा निकाल 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
कोकणच्या कृषी संस्कृतीला चालना देणारा, महिलांच्या पाककलेतील कौशल्याला सन्मान देणारा आणि वाशिष्ठी डेअरीच्या दुग्धजन्य उत्पादनांचा दर्जा अधोरेखित करणारा हा कृषी महोत्सव नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. ‘गोडवा वाशिष्ठी प्रॉडक्ट्सचा. प्रत्येक क्षण आनंदाचा.’ या ब्रीदवाक्याप्रमाणे हा महोत्सव कोकणवासीयांच्या मनात कायमस्वरूपी गोड आठवण निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Ratnagiri News :  6 जानेवारीला पशुधन स्पर्धा; वाशिष्ठी कृषी महोत्सवात होणार पशुपालकांचा सन्मान

Web Title: Chiplun news foodies delight at vashishthi agricultural festival special attraction of cooking competition on 8th and 9th january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
2

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध
3

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा
4

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.