
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 व 2 (600 मेगा वॅट) येथे प्रस्तावित 3 महिने वीज बंद करण्यात आली. दरम्यान यात गळतीरोधक पूर्वतयारी व टप्पा 1 व 2 बंद केल्यामुळे उदभवणाऱ्या चिपळूण तालुक्यातील शिरगाव मुंढे व पोफळी गावांच्या पाणीपुरवठा समस्येवरील पर्यायी व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 13डिसेंबर 2025 रोजी क्षेत्रीय पूर्व पाहणी करण्यात आली.
कोयना बांधकाम विभाग क्रमांक 1,कोयनानगर चे कार्यकारी अभियंता इंजि. व्ही. बी. सानप यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी झाली. मात्र गळती मार्गाने जाणारे पाणी बंद करणे काळाची गरज होती त्यामुळे पाणी अडविण्यासाठी गेट टाकण्यात आले त्याचा फटका तीन गावच्या पाणी पुरवठ्याला बसला आहे.
याबाबत तीन गाव ग्रामस्थ यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. त्यानुसार शेखर निकम यांनी कोयना बांधकाम विभाग क्रमांक 1, कोयनानगरचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. सानप यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. त्यानंतर पोफळी महानिर्मिती कंपनीमध्ये अधिक्षक अभियंता श्री चोपडे यांच्या दालनात अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. त्यानुसार तिन्ही गावांना पाणी देण्यात येईल त्यासाठी दहा लाख लिटर पाणी साठवण करून ठेवले आहे.
मात्र कमी दाबाने पाणी येईल असे अधिकारी यांनी ग्रामस्थ यांना सांगितले त्यानंतर गावकऱ्यांना अर्धा तास पाणी मिळेल. मात्र अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक संपल्यावर काही वेळात पाणी बंद झाले त्यामुळे अधिकारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सदरच्या कामाचा कालावधी तीन महिन्याचा आहे. मात्र जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काम सुरू करून देणार नसल्याची भूमिका तीन गावातील नेत्यांनी व ग्रामस्थानी घेतली असल्याचे समजते.
Ans: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 व 2 (600 मेगावॅट) येथे गळतीरोधक कामासाठी तीन महिन्यांचा वीज बंद कालावधी नियोजित करण्यात आला आहे.
Ans: या गळतीरोधक कामामुळे चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कोंडफणसवणे व मुंढे (पोफळी) या तीन गावांच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Ans: गळती मार्गाने जाणारे पाणी अडविणे आवश्यक असल्यामुळे संबंधित गेट टाकण्यात आले असून त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.