कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा क्र. 1 व 2 (स्थापित क्षमता 600 मे.वॅट) चे बांधकाम सन 1959-1962 मध्ये पूर्ण झाले असून, तेव्हापासून अविरतपणे वीजनिर्मिती होत आहे. या ट्प्प्यांसाठी आवश्यक पाणी, कोयना धरणातून, नवजा प्रवेश मांडणीतून शीर्षवाही भुयार (Head Race Tunnel) द्वारे घेतले जाते. HRT च्या शेवटी, दाब भूयारांचे आरंभी उल्लोळक विहिर (Surge Well) बांधण्यात आली आहे. उल्लोळक विहिरीतून चार ऑफटेक असून त्याद्वारे पाणी वाहून आपत्कालीन झडप भुयारामधील (Emergency Valve Tunnel) बटरफ्लाय वॉल्व्हद्वारे नियंत्रित केले जाते. या मांडणीतून, HRT द्वारे वाहून आणलेले पाणी EVT आणि Downward Pressure Shaft द्वारे 8 टर्बाइन युनिट्समध्ये प्रवेश करते.
सदर प्रकल्पाचे संचलन महानिर्मिती कंपनीमार्फ़त सुरु आहे. महानिर्मिती कंपनीने आपत्कालिन झडपभुयार व वायुवीजन भुयार येथून साधारणत: 2002 पासून होणा-या गळतीबाबत व 2012 नंतर वाढलेल्या गळतीच्या प्रमाणाबाबत अवगत केलेनुसार, जलसंपदा विभागामार्फ़त जलवहन प्रणालीपैकी उल्लोळक विहीर व आपात्कालीन झडप भुयार यंत्रणेची २०१७ साली आधुनिक तंत्रज्ञान (ROV) व यंत्रसामग्री वापरुन तपासणी करण्यात आली.
मात्र हे दोन्ही टप्पे बंद झाले तर नेमके काय होऊ शकते. जर असे झाले तर होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी मेंटन करता येणार नाही त्यामुळे सर्वाधिक लोड थर्मल प्रोजेक्ट यांचावरती येऊ शकते.त्यामुळे खाजगी वीज निर्मिती केंद्र यांच्याकडून विज खरेदी करावी लागेल.तसेच सर्वाधिक लोड थर्मल प्रोजेक्ट वरती येईल कारण आज विजेची मागणी असल्यास काही मिनिटात टप्पा 1 व टप्पा 2 वीजनिर्मिती करून दिली जात होती.
तसे आता होणार नाही त्यामुळे राज्यातील चार ते पाच थर्मल प्रोजेक्ट कमी वेळात वीजनिर्मिती करतील. तसे पाहता कोयना जलविद्युत केंद्रात चार टप्प्यातून 1960 मेगाव्हेट एवढी वीज निर्मिती होते. त्यामध्ये टप्पा एक व दोन 600 तर चौथा टप्पा मधून 1000 मेगाव्हेट वीज निर्मिती व कोळकेवाडी टप्प्यातून 320 मेगाव्हेट वीज निर्मिती होते.
टप्पा एक व दोन मधून वीज निर्मिती झाली की त्याचे पाणी थेट स्वतंत्रपणे कोळकेवाडी धरणात सोडले जाते. टप्पा ४ व ४ब साठी 1999 व 2012 साली शिवाजीनगर जलाशयात घेण्यात आलेल्या लेक टैप मधून थेट स्वतंत्रपणे येते व वीजनिर्मिती होऊन पुन्हा स्वतंत्र टीआरटी द्वारे कोलकेवाडी धरणात सोडण्यात येते. त्यानंतर कोळकेवाडी प्रकल्पातील 320 MW वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे टप्पा 1 व 2 दुरुस्तीसाठी बंद झाल्यास कमी वीज मागणीच्या काळात प्रस्तावित आउटेज चा फारसा परिणाम वीज पुरवठ्यावर होणार नाही.
तसेच टप्पा 1व 2 च्या ईव्हीटी मधून जीवन प्राधिकरणामार्फत शिरगाव मुंढे, कोंडफनसावाने, ई गावांचा केलेला पिण्याचा पाणीपुरवठा साधारण तीन महिने बंद होईल. तसेच, ज्यावेळी या गावांना पाणीपुरवठा उद्भव मंजूर करून देण्यात आला होता त्यावेळी “भविष्यात काही कारणास्तव दुरुस्तीकामसाठी टप्पा1 व 2 बंद केल्यास संबंधित जोडणी देण्यात आलेल्या ग्राहकानी/यंत्रणांनी त्यांचेस्तरवर पर्यायी व्यवस्था करावी “ अशी अट नमूद असल्याचे सिंचन विभागाकडून समजते.
सह्याद्रीच्या पर्वत रांगा मध्ये टप्पा1 व2 चा सदरचा भुयारी बोगदा आहे. 2002 मध्ये अत्यंत कमी प्रमाणात ह्या बोगद्याला गळती लागली होती. त्यातून पाणी बाहेर पडू लागले हळूहळू त्याच्या गळतीचे प्रमाण वाढले सदर सर्वेक्षणांती, तांत्रिक सल्लागारांमार्फ़त सादर अहवालानुसार, टप्पा क्र. 1 व 2 च्या आपत्कालीन झडप बोगदा व वायुवीजन बोगदा येथील गळतीचा मुख्य स्त्रोत हा टप्पा क्र. 1 व 2 च्या उल्लोळक विहिरीची परीघ भिंत, आणि भोवतालचे खडकातील भेगा यातून मोठ्याप्रमाणात झिरपणारे पाणी आहे.
पाणी जास्तीत जास्त प्रमाणात मुख्यत्वेकरुन आपत्कालिन झडपभुयारात खूप प्रमाणात गळत असून तेथून ते वायुवीजन बोगद्यातून बाहेर डोंगर उतारावर वाहते. राष्ट्रीय महामार्ग क्र. 166इ (विजापूर-चिपळूण) च्या कुंभारली घाटातून दिसणा-या वायुवीजन बोगद्याच्या बाजूच्या दरीत वाहत असल्याचे दिसते. त्यामुळे, नागरिकांमध्ये धरणाच्या गळती बाबत संभ्रम व भिती निर्माण होत आहे. त्यानुसार सदर, टप्पा क्र. 1 व 2 च्या आपत्कालीन झडप बोगदा व उल्लोलक विहीर येथे ग्राउटींग, रॉक बोल्टींग व संलग्न उपाययोजनेसंदर्भात कामे हाती घेण्यात आली आहेत.
सद्यस्थितीत आपातकालीन झडप भुयारामधील वाढलेली पाण्याची गळती तसेच खडकामधील रुंदावलेल्या भेगांचे प्रमाण विचारात घेता उल्लोळक विहिरीतील काम पूर्ण करून आपातकालीन झडप भुयारातील गळतीरोधक व खडकांचे स्थिरीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. टप्पा 1 व 2 च्या उल्लोळक विहिर व आपातकालीन झडप भुयार येथील संधानकाचे (Steining Wall) झालेले क्षरण/झीज, भुयारातील दगडांमध्ये वाढलेल्या भेगा व एकंदरित वाढणाऱ्या गळतीचे प्रमाण, त्यामुळे टप्पा 1 व 2 येथील धरण प्रकल्पाच्या महत्वाच्या उपांगांना निर्माण झालेला धोका व भविष्यातील अविरत वीज निर्मितीची गरज, धरण सुरक्षा कायदा 2021 मधील तरतूदी व धरण प्रकल्पाच्या उपांगांची सुरक्षा, आव्हानात्मक क्षेत्रीय परिस्थिती, पूर्वानुभव, नोंदविलेली निरिक्षणे, काम करण्यासाठी उपलब्ध कालावधींचे पर्याय, काम पूर्ण करण्यासाठी किमान वीज मागणीच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी व मार्च महिन्यातील साधारणत 90 दिवसांच्या “Total Shut Down” मिळणेबाबतचा प्रस्ताव महाजेंको व महावितरण कंपनीकडे मान्यतेकामी सादर करण्यात आला आहे.
जवळपास तीन महिने काम चालणार आहे मात्र सदरचे काम खूप जोखमीचे असल्याचे सांगितले जात आहे कारण सर्जविल ही एक मोठी विहीर असून त्याची 300 फुट इतकी खोल असून कोयना प्रकल्पाचे जलसंपदा विभागाचे अभियंते व कंत्राटदार यांचे मार्फत सदरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 25 कुशल कामगार काम करणार आहेत. खोल विहिरीत जाऊन पूर्णपणे पाणी बंद करून लागलेली गलती बंद करण्यात येणार आहे यापूर्वी रोबोच्या माध्यमातून याचे प्रात्यक्षिक व तपासणी घेण्यात आले होते त्यानुसार आता प्रत्यक्षात काही दिवसातच कामाला सुरुवात होणार आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू झाला आहे मात्र आत्तापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून आले नाहीत त्यामुळे कामाची निश्चित तारीख सांगितली जात नाही मात्र सदरच्या कामामुळे शिरगाव कोंड फणसवणे मुंडे या तीन गावांना पाण्याची झळ बसणार आहे कारण टप्पा एक व टप्पा दोन या ठिकाणी इव्हीटी आहे त्यातून काही गावांना ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र टप्पा एक व टप्पा दोन बंद झाल्यामुळे तीन ते चार गावांना पाण्याचा फटका बसणार आहे तर चौथा टप्प्या या ठिकाणी इव्हीटी आहे. त्या ठिकाणाहून ग्रेव्हीचे माध्यमातून काही गावांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे त्यांना पाण्याची झळ बसणार नाही.
शिरगाव परिसरातील तीन गावांना महिन्यासाठी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. तर महानिर्मिती कंपनीची वसाहत याला सुद्धा पाण्याची झळ बसणार आहे. जर कोलकेवाडी धरण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मोठी साठवण टाकी बांधून त्यामध्ये सर्व गावाचे पाईपलाईन सोडण्यात आले असते तर पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता मात्र तसे करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत यांना पाइपलाइन खर्च करावा लागणार आहे. कारण वाशिष्ठी नदीपात्रात जॅकवेल बांधण्यात आले आहेत. त्यातून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच वाशिष्ठी नदीला टप्पा 4, 4ब व टप्पा 3 मधून पाणी येणार असल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही असे धरण विभागाचे म्हणणे आहे.
Ans: ग्राउटींग (भेगा भरून मजबुतीकरण) रॉक बोल्टींग संधानक भिंतीची मजबुती गळतीरोधक उपचार ही सर्व कामे खोल भुयारी विहिरीत (सर्जविल – 300 फूट खोल) अत्यंत कौशल्याने केली जातील.
Ans: कमी वीज मागणीच्या हंगामात हा शटडाउन असल्याने वीज पुरवठ्यावर जास्त परिणाम अपेक्षित नाही. टप्पा 1 व 2 शिवाय इतर टप्प्यांतून पाणी थेट कोलकेवाडी धरणात सोडले जाते आणि तेथून 320 MW वीजनिर्मिती सुरळीत राहू शकते.
Ans: टप्पा 1 व 2 च्या भुयारी बोगद्यात गेल्या काही वर्षांत गळती वाढत आहे. 2002 मध्ये ही गळती अत्यंत अल्प होती; परंतु काळानुसार खडकातील भेगा, संधानक भिंतीची झीज आणि पाणी झिरपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता ही गळती आपत्कालीन झडप भुयार व वायुवीजन बोगदा मार्गे बाहेर पडताना स्पष्ट दिसत असल्याने दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.






