Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Zilla Parishad: ‘मिनी मंत्रालया’चा ताबा कुणाकडे? ७ एप्रिलला हाय-व्होल्टेज ड्रामा; रत्नागिरीत राजकारण तापले

जिल्हा परिषदेत 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीसह या समितीत एकूण आठ सदस्यांची निवड होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 06, 2026 | 06:15 PM
Ratnagiri Zilla Parishad: ‘मिनी मंत्रालया’चा ताबा कुणाकडे? ७ एप्रिलला हाय-व्होल्टेज ड्रामा; रत्नागिरीत राजकारण तापले
Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालीं
  • स्थायी समितीच्या ८ जागांसाठी जोरदार रस्सीखेच
  • विविध प्रशासकीय समित्यांची नवी रचना आणि आरक्षण जाहीर
Ratnagiri Zilla Parishad:  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना उधाण आले आहे. मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्यांच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून ही प्रक्रिया केवळ तांत्रिक औपचारिकता न राहता सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. यंदा प्रशासनाने शासनाच्या कठोर नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिल्याने अनेक प्रस्थापित नेत्यांची गणिते बदलण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आपल्या गटाला जास्तीत जास्त महत्त्वाची पदे कशी मिळतील, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. शासकीय निकषांचे काटेकोर पालन करून ही प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रत्येक सदस्याला न्याय देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

जिल्हा परिषदेत ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीसह या समितीत एकूण आठ सदस्यांची निवड होणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती (एसी), जमाती (एसटी) किवा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित असल्याने राजकीय पक्षांना आपल्या गोटातील योग्य उमेदवाराची निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील विकासकामांचे धोरणात्मक निर्णय याच समितीत घेतले जात असल्याने येथे स्थान मिळवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली

 

समतोल राखत ‘प्रत्येकाला संधी’

प्रशासनाने यंदा एक महत्त्वाचा बदल केला आहे. प्रत्येक सदस्याला किमान एका समितीवर संधी मिळणे बंधनकारक आहे, या नियमामुळे यापूर्वी गटतटाच्या राजकारणात किंवा पक्षांतर्गत स्पर्धेत डावलल्या गेलेल्या सदस्यांना आता हक्काने पद मिळणार आहे. समाजकल्याण या ९ सदस्यांच्या समितीत ५ जागा एससी/एसटीसाठी तर ४ जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे, ज्यामुळे सामाजिक समतोल साधला जाईल.

Baramati News : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला

७० टक्के आरक्षणाने वाढणार ‘वजन’

यंदाच्या निवड प्रक्रियेत महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला सदस्यांचा दबदबा निर्माण होणार आहे. महिला व बालकल्याण समिती वा ८ सदस्यांच्या समितीत तब्बल ६ जागा (७० टक्के) महिलांसाठी राखीव आहेत. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये एकूण ६ सदस्यांपैकी किमान ३ महिला असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तरतुदीमुळे महिला सदस्यांना धोरणात्मक निर्णयांमध्ये मोठी भूमिका बजावता येणार आहे.

सामाजिक समतोल साधण्याच्या उद्देशाने विविध प्रशासकीय समित्यांची नवी रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि मागास प्रवर्गाला प्राधान्य देण्यात आले असून, प्रभाग आणि समाजकल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

समितीचे नाव एकूण सदस्य विशेष अट / आरक्षण
स्थायी समिती ०८ अध्यक्ष व सभापतींसह काही जागा आरक्षित.
महिला व बालकल्याण ०८ एकूण ८ पैकी ६ जागा महिलांसाठी अनिवार्य (७० टक्के आरक्षण).
समाजकल्याण ०९ ५ जागा एससी/एसटी (SC/ST) आणि ४ जागा मागास प्रवर्गासाठी राखीव.
जलव्यवस्थापन — या समितीमध्ये किमान ३ महिला सदस्य असणे अनिवार्य आहे.
इतर (शिक्षण, आरोग्य, वित्त) ०८ ते १० गरजेनुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Ratnagiri zp mini ministry battle high stakes election for standing and subject committees on april 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Breaking News
  • Maharashtra Politics
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
4

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.