Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 02:29 PM
Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार
Follow Us
Follow Us:

होळीनिमित चिपळुणातून एसटीच्या २७४ फेऱ्या
शिमगोत्सवासाठी १५ मार्चपर्यंत राहणार सेवा
स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची केली नेमणूक

चिपळूण: वैशिष्ट्यपूर्ण असलेला कोकणच्या शिमगोत्सवाला गावागावतून प्रारंभझाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याठिकाणी असणारे बहुसंख्यने गावच्या दिशेने दाखल होवू लागले आहेत. यासाठी चिपळूण आगारातून जादा एसटी फेऱ्याचे नियोजन केले आहे. या फेऱ्यांना फेब्रुवारी अखेरीस प्रारंभ झाला असून १५ मार्चपर्यंत तब्बल २७४ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. कोकणात प्रमुख सणापैकी एक असणाऱ्या शिमगोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

होळी, पालखी सोहळा, जत्रा अशा माध्यमातून संस्कृतीचे घडवणाऱ्या शिमगोत्सवाची विविध दर्शन ओढ असते. ठिकठिकाणी प्रत्येक कोकणवासियाला तालुक्यात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर असणारे बहुतांशी भाविक गावच्यादिशेने दाखल झाले आहेत. यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व शिमगोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराने प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही विशेष नियोजन केले आहे.

Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train

गावच्या दिशेने भाविक येऊ लागल्याने मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. चाकरमान्याच्या मागणीनुसार बसस्थानकातून सुटणाऱ्या व पुन्हा तेथून बसस्थानकात येणाऱ्या फेऱ्याचे आगार प्रशासनाने नियोजन केले आहे. या फेऱ्यांना २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. १५ मार्च पर्यंत या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. आहे. त्यानुसार एकूण २७४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शिमगोत्सवात गावी येणाऱ्या जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुलभ झाला आहे.

मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे. त्यासाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून गुहागर, खेड, विपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फे-याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे. मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली.

Web Title: Chiplun bus depo run 274 st buses for passengers shimga festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Chiplun
  • holi 2026
  • Kokan News
  • msrtc

संबंधित बातम्या

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
1

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
2

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

Chiplun Ganpati Visarjan: कुंभाळीत अनोखी परंपरा! आई महाकालीच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावरच इतर बाप्पांना निरोप
3

Chiplun Ganpati Visarjan: कुंभाळीत अनोखी परंपरा! आई महाकालीच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावरच इतर बाप्पांना निरोप

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
4

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.