जिल्ह्यात नववर्ष स्वागताचा जल्लोष (फोटो- सोशल मीडिया)
रत्नागिरी जिल्ह्यात नववर्ष स्वागताचा जल्लोष
स्थानिकांनी सरत्या वर्षाचा सूर्यास्त घेतला डोळ्यात साठवून
सगळ्यावर प्रशासनाची सर्वत्र करडी नजर
रत्नागिरी / दापोली: २०२५ या सरत्या वर्षाला (New Year)निरोप देण्यासाठी आणि २०२६ या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण कोकणातील किनारपट्टीवर पर्यटक आणि स्थानिक जनतेने मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. रत्नागिरीतील भाट्ये किनारपट्टीसह गणपतीपुळे, जयगड, नाटे, गुहागर तसेच दापोलीतील हर्णे आणि अन्य किनाऱ्यांवर पर्यटक आणि स्थानिकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताचा मनोहारी सोहळा हृदयात जपून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार जल्लोष करण्यात आला. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाला वर्षांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी यानिमित्ताने पर्यटनाचा आनंदही अनुभवला. जिल्हाभरातील हॉटेल्स आणि पर्यटन रिसॉर्ट्स हे फुल असल्याचे दिसून आले. मात्र गणपतीपुळे तसेच अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे किनारपट्टी गजबजवून गेली.
New Year Party: कोकणात पर्यटकांची गर्दी; रत्नागिरी पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
राज्याच्या विविध भागांतून पर्यटकांचे झाले आगमन
कोकणच्या सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ स्थानिकय नव्हे, तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले आहेत, गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरातील हॉटेल्स, लॉज आणि होमस्टे ‘हाऊसफुल्ल झाले असून, पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे, आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने भाटले किना-यावर दुपारपासूनच पर्यटकांचा औध सुरू झाला होता, क्षितिजावर मावळणाऱ्या २०२५ च्या शेवटच्या सुर्यकिरणांना निरोप देताना अनेक पर्यटक भावूक झाले होते, तर त्याच उत्साहात २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘सेल्फी आणि जल्लोषात तरुण पिढी मग्न दिसून आली. पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेता रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या वतीने समुद्रकिनारी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सगळ्यावर प्रशासनाच सर्वत्र करडी नजर
मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद आधी ठिकाणाहून पर्यटक मोठा संख्येने दाखल झाले आहेत. ख्रिसमसची सुट्टी गुलाबी थंडी व नववर्ष स्वागत यामुळे सध्या बोकणात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. दापोलीतील मुरुड करते लाडघर आधी समुद्रकिनारे गदर्दीने फुलून गेले आहेत अनेकांच्या पाटबाँचे बेत रंगले आहेत. या सगळ्यावर पॉलिस प्रशासनाची ही करडी नजर आहे. दापोलीतील हॉटेल रिसॉर्ट घरगुती निवासव्यवस्था आदी ठिकाणे फुल्ल झाली आहेत. कोकणातील मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोली मध्ये थडीचा कडाकाही मोठा आहे. त्यामुळे दापोलीत पहात असलेली गुलाबी थंडी ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






