Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report

एकीकडे कोकणात उष्णतेचा कडाका वाढणार असताना, पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाचा इशारा कायम असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 02:03 PM
कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report
Follow Us
Follow Us:

कोकणातील उन्हाळा वाढणार
उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा
रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांत ‘हिटवेव्ह’

रत्नागिरी: मार्चच्या सुरुवातीला वाढलेला उकाडा आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत परिस्थितीत पुन्हा बदल झाला असून, रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्ह्यांत तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत पोहोचू शकतो. काही भागांत गारपीट होण्याचाही अंदाज आहे. दुसरीकडे, मुंबईसह संपूर्ण कोकण पट्टधात मात्र पावसाची शक्यता नसून तापमान झपाट्‌याने वाढणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशात सध्या मजबूत वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय आहे

उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा
या प्रणालीमुळे हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे ओलसर वारे हिमालयात धडकून उत्तर भारतात पाऊस व हिमवृष्टी घडवून आणतात. यावेळचा डिस्टरबन्स अधिक प्रभावी असल्याने त्याचा परिणाम देशभर जाणवत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेत ओलावा वाढला आहे.

Weather update : सूर्य आग ओकतोय…मार्चमध्येच पारा 40 अंशावर, या वेळेत घराबाहेर पडू नका, Heatwave चा अलर्ट

हा ओलावा उष्ण हवेच्या संपर्कात आल्याने ढगांची निर्मिती वेगाने होत असून, काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे. एकीकडे कोकणात उष्णतेचा कडाका वाढणार असताना, पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाचा इशारा कायम असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे पहाटे व रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसा उन्हाचा चटका वाढणार आहे. कोकण आणि गोवा पट्टधातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून, पावसाची शक्यता नाही. परिणामी, या भागांत उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मार्चमध्येच पारा 40 अंशावर

यंदाच्या हंगामात उष्णतेने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कहर केला आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच कमाल तापमान 42 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तसेच काही दिवस तापमानात घसरण झाली असून मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला. आता पुन्हा शहर आणि उपनगरांता तीव्र उन्हाचे चटके बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. परिणामी 12 ते 4 घराबाहेर पडताना काळजीपूर्वक बाहेर पडा. कारण गेल्या १० मार्च रोजी मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे.

Web Title: Heat wave increased in kokan ratnagiri palghar latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • heat wave
  • kokan
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार
1

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
2

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
3

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

RATNAGIRI: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी
4

RATNAGIRI: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.