Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 05:17 PM
हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये २९० रस्ते बंद

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये २९० रस्ते बंद

Follow Us
Follow Us:
  • खेड मध्ये मुसळधार सुरूच
  • जगबुडी नदी धोका पातळीच्या वर
  • पुराचा धोका कायम
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळपासून आणखी जोर धरला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडत ७.७० मीटरची धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे खेड शहरातील बाजारपेठेवर पुन्हा पुराचे संकट घोंगावत असून अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर

गेल्या सहा दिवसांपासून खेड शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नारिंगी, चोरद आणि जगबुडी या नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. भरणे येथील जगबुडी नदीने बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता ६ मीटरची इशारा पातळी ओलांडली, तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी गाठली.

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

बाजारपेठेत पुन्हा शिरले पाणी

नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे खेड शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच ही बाजारपेठ सलग १८ तासांहून अधिक काळ पुराच्या पाण्याखाली होती. या पुरामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा पावसाचा वेग वाढल्याने तशाच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पूरस्थितीची शक्यता कायम

सतत पडणारा पाऊस आणि नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे खेड शहरासह नदीकाठच्या भागांवर पुन्हा पुराचा विळखा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीचे पाणी आणखी वाढल्यास बाजारपेठ आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर खेड प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिक, व्यापारी आणि सखल भागातील रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास तयार राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल, पोलीस, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने खेड तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

Maharashtra Rain: राज्यभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार! १ जूनपासून ६२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’

Web Title: Khed jagbudi river crosses danger level flood threat ratnagiri news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • maharashtra
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
1

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
2

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
3

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
4

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.